Thursday, May 15, 2025

मनोरंजनताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Gautami Patil : नृत्यांगना गौतमी पाटील लवकरच येणार नव्या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला

Gautami Patil : नृत्यांगना गौतमी पाटील लवकरच येणार नव्या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे : आपल्या नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी नृत्यांगणा गौतमी पाटील एका नव्या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत "कृष्ण मुरारी" या गाण्याचे पोस्टर गौतमी पाटीलने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहे.


गौतमी तिच्या पहिल्या गवळण गीताविषयी म्हणली की, "लोकसंगीतातील गवळण हा नृत्यप्रकार मला फार आवडतो. माझी खूप दिवसांपासून गवळण करण्याची इच्छा होती. साईरत्न एंटरटेन्मेंट प्रस्तुत "कृष्ण मुरारी" या गाण्यामुळे माझी इच्छापूर्ती झाली. मी सोशल मीडियावर या गाण्याच पोस्टर नुकतेच शेअर केलं आहे. प्रेक्षकांचा या गाण्याच्या पोस्टरला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या गाण्याचा टीजर ३ एप्रिलला प्रदर्शित होईल."



"कृष्ण मुरारी" या गाण्याचे निर्माते संदेश गाडेकर आणि सुरेश गाडेकर हे आहेत. गायिका गायत्री शेलार हिने हे गाणं गायलं असून विशाल शेलार यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. मनीष महाजन या गाण्याचे दिग्दर्शक आहे. तर या गाण्याचे संगीत आयोजन आदित्य पाटेकर व करण वावरे यांनी केले आहे. या गाण्याची उत्सुकता गौतमीच्या सर्व चाहत्यांना लागली आहे.

Comments
Add Comment