Train Accident: झारखंडमध्ये मोठा रेल्वे अपघात, दोन मालगाड्यांची समोरासमोर टक्कर

  93

नवी दिल्ली: झारखंडच्या बरहेटमध्ये दोन मालगाड्यांची आपापसात टक्कर झाल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर चार जण जखमी झालेत.


खरंतर, फरक्का येथून ललमटिया येथे जात असलेली मालगाडी बरहेटमध्ये उभ्या असलेल्या मालगाडीला आदळली. ही टक्कर इतकी जोरदार होती की दोन्ही मालगाड्यांच्या इंजिनांच्या चिंधड्या उडाल्या आणि आग लागली. या मालगाड्या कोळसा घेऊन जात होत्या.


घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेडची गाडी तेथे पोहोचली. दोन्ही लोको पायलटचा या दुर्देवी मृत्यू झाला. दरम्यान, जे चार जण यात जखमी झाले ते सर्व रेल्वेचे कर्मचारी आणि सीआयएसएफ जवान आहेत. या सर्व जखमींना उपचारासाठी नजीकच्या आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहे. दरम्यान, प्रशासनाची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. तसेच या अपघातामागचे कारण शोधले जात आहे .


 


मार्ग सुरळीत करण्यासाठी लागतील ३ दिवस


ही घटना मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. या अपघातानंतर मालगाडीच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच हा मार्ग बंद झाला आहे. याला सुरळीत करण्यासाठी २ ते ३ दिवसांचा कालावधी लागू शकतो.


दरम्यान, रेल्वे मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. रेल्वे विभाग या अपघाताचा तपास करत आहे. दरम्यान, दोन्ही मालगाड्या एकाच रेल्वे रूळावर आल्या कशा याचा तपास केला जात आहे. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ झाला होता. रेल्वे कर्मचाऱ्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणली.

Comments
Add Comment

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे

पाकिस्तानमधून आरडीएक्सने राम मंदिर उडवण्याचा मेसेज; गुन्हा दाखल

बीड : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्री राम मंदिर उडवण्याचा मेसेज थेट पाकिस्तानातून बीड जिल्ह्यातील एका तरुणाला

इंडिगोच्या विमानात कानशिलात! पॅनिक अटॅक आलेला तरुण बेपत्ता!

मुंबई : मुंबईहून कोलकात्याकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाइटमध्ये एक धक्कादायक घटना घडली. पॅनिक अटॅकचा

Prajwal Revanna : मोठी बातमी, माजी पंतप्रधानांच्या नातूला बलात्कार प्रकरणात जन्मठेप!

बेंगळुरू :  माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांचे नातू आणि माजी JD(S) खासदार प्रज्वल रेवण्णा (वय ३४) यांना बलात्कार

Kulgam Encounter : दक्षिण काश्मीरमध्ये आणखी एक दहशतवादी ठार, आठवड्याभरात दुसरी चकमक

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यातील अखल गावात शुक्रवारी रात्री झालेल्या