Thursday, April 3, 2025
Homeब्रेकिंग न्यूजDisha Salian Case : दिशा सालियन प्रकरणी सुनावणीपूर्वीच न्यायमूर्तींच्या भूमिकेवर प्रश्न

Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणी सुनावणीपूर्वीच न्यायमूर्तींच्या भूमिकेवर प्रश्न

मुंबई : आपल्या मुलीचा मृत्यू संशयित असून तिची हत्या झाल्याचा आरोप करत दिशा सालियनच्या वडिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा नव्याने तपास व्हावा अशी मागणी त्यांनी न्यायालयात केली आहे. तसेच, आपल्या वकिलांसह त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन याप्रकरणी तक्रारही दाखल केली आहे. आपल्या तक्रारीत शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, सूरज पांचोली यांच्यासह आणखी काही जणांची नावे घेत गंभीर आरोप केले आहेत. आता, याप्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीला सुरुवात होत आहे. दिशा सालियन मृत्यूप्रकरणी दिशाचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी (दि. २ एप्रिल) रोजी मुंबई उच्च न्यायालयात पहिली सुनावणी होत आहे. त्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर दिशाचे वडील सतिश सालियन यांच्या वकिलांनी पत्रकार परिषद घेऊन थेट न्यायाधीशांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न उपस्थित केले आहेत.

Chitra Wagh : ‘रडत रौत म्हणजे उबाठासेनेचा पोपट’

आमच्याकडून सुनावणीची पूर्ण तयारी झाली आहे, मात्र उद्या सुनावणीत काही होण्याची शक्यता कमी आहे. कारण, ज्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे, त्यांच्याविरोधातच आमची तक्रार आहे, असे सतिश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी म्हटले. न्यायमूर्तींची सख्खी बहीण वंदना चव्हाण सक्रिय राजकारणी असून त्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षात आहेत. त्यामुळे, विविध कारणांमुळे उद्या हे प्रकरण न्यायालयाकडूनच दुसऱ्या खंडपीठासमोर घेऊन जा, असे सांगितले जाण्याची शक्यता आहे, असा आरोपच निलेश ओझा यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.

Waqf Bill : भाजपाचे सर्व खासदार हजर व्हा, वक्फ विधेयकासाठी व्हिप जारी

१ लाख कोटींचा दावा, लाडकी बहीण योजनेसाठी देणार ९० टक्के रक्कम

दिशा सालियन प्रकरणात दिशाचे वडील सतीश सालियन यांनी १ लाख कोटींच्या मानहानीचा दावा तयार केला आहे. विशेष म्हणजे या दाव्यातून मिळणारी ९० टक्के रक्कम मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस अनुदान म्हणून देणार असल्याची घोषणाच सतिश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी केली आहे. तर, १ लाख कोटी रुपयांच्या मानधनातील उर्वरित ९ टक्के रक्कम इमानदार पत्रकारांसाठी खर्च करणार असून केवळ १ टक्का रक्कम सतीश सालियन स्वत:कडे ठेवणार आहेत, अशी माहितीही निलेश ओझा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Waqf Bill and Maharashtra Politics : वक्फ विधेयक बुधवारी लोकसभेत सादर होणार, उद्धव गट काय करणार ?

दिशाच्या हत्येवरुन आरोप-प्रत्यारोप

दरम्यान, दिशा सालियन प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोपांचा फैरी सुरू आहेत. दिशाच्या शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू अपघाताने डोक्याला मार लागूनच झाल्याचे म्हटले आहे. तर, दिशा सालियानच्या मृत्यूवरून आरोप होत असतानाच दिशा सालियानने वडिलांच्या अफेअरमुळे संबंधितांना पैसा देऊन थकली होती. कष्टानं कमावलेला पैसा नको त्या बाबींसाठी खर्च होत असल्याने दिशाने याबाबत मित्रांशी सुद्धा बोलणे केले होते. याच आर्थिक तणावातून दिशाने आत्महत्या केल्याचे मालवणी पोलिसांच्या तपासानंतर क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. यापूर्वी झालेल्या शवविच्छेदन अहवालामध्येही दिशावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार झाला नसल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. मात्र, हे सर्व तत्कालीन सरकारच्या दबावातून फेरफार करुन बनवण्यात आल्याचे सतिश सालियन यांच्या वकिलांनी म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -