दरभंगा (बिहार) : बिहारमधील दरभंगा जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. दुर्गा मातेचे दर्शन घेऊन परतत असलेल्यांवर मोहम्मद अलाउद्दीनच्या घराच्या छतावरुन दगडफेक करण्यात आली. दगडफेक सुरू झाल्यामुळे दुर्गा मातेच्या भाविकांची पळापळ झाली. या धावपळीत दगड लागल्यामुळे तसेच धडपडल्यामुळे काही महिला जखमी झाल्या आहेत. ही घटना कुशेश्वर स्थान परिसरातील केवटगामा पंचायतीतल्या पछियारी गावात घडली.
धक्कादायक घटना, एसी कंटेनरमधून ५७ टन गोमांस जप्त
लोणावळा : मुंबई - पुणे एक्सप्रेस वे वर लोणावळ्याजवळील कुसगावच्या हद्दीत दोन एसी कंटेनर पकडण्यात आले. या कंटेनरची तपासणी केली असता त्यातून गोमांसाची ...
चैत्र नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवसानिमित्त भाविक दुर्गा मातेच्या मंदिरात कलश स्थापनेसाठी गेले होते. हा विधी पूर्ण करुन परतत असलेल्या भाविकांवर मोहम्मद अलाउद्दीनच्या घराच्या छतावरुन दगडफेक करण्यात आली. दगडफेक सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी आले. मोठा पोलीस फौजफाटा पोहोचल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
Raj Thackeray : औरंगजेबाला मराठ्यांनीच गाडले असा फलक कबरीजवळ लावावा!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
मुंबई : औरंगजेब २७ वर्षे महाराष्ट्रात लढला. शिवाजी नावाचा विचार त्याला संपवायचा होता. जगभरात औरंजेबाचा इतिहास ...
याआधी धूलिवंदनाच्या दिवशी कुशेश्वर स्थान परिसरात दोन गटात तणाव निर्माण झाला होता. लाठ्या काठ्यांचा वापर करुन एकमेकांवर हल्ला करण्यात आला होता. या घटनेच काही जण जखमी झाले होते. पोलिसांनी कारवाई करुन परिस्थिती नियंत्रणात आणली होती.