नवी दिल्ली : वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणात जर तुम्हाला चलन आले असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडणार आहे. जरी मेसेज आला नाही तरी आता मोबाईलवर तुमच्या वाहनाला आलेली चलने पाहता येतात. यामुळे ती तपासत रहा, नाहीतर तीन महिन्यांनी तुमचे ड्रायव्हिंग लायसन रद्द केले जाणार आहे.
सुप्रीम कोर्टाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून चलन आणि त्यांच्या भुगतानाबाबत अहवाल मागवला होता. ई-चलनच्या वसुलीमध्ये महाराष्ट्र आणि हरियाणा ६२-७६% दरासह पहिल्या क्रमांकावर आहेत. तसेच दिल्लीमध्ये सर्वात कमी १४% रिकव्हरी रेट तर कर्नाटकमध्ये २१ टक्के रेट आहेउत्तर प्रदेशात हा आकडा २७ टक्के, तर ओडिशात सर्वाधिक २९ टक्के आहे. इतर राज्यांतही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे सरकार नियम कडक करत आहे.
सरकारकडून करण्यात येत असलेल्या या बदलांमुळे चलन भरण्याचे प्रमाण वाढेल आणि ट्रॅफिक नियमांचे पालनही सुधारेल,असे सरकारला वाटते. आता चालकांना वेळेत दंड भरणे अनिवार्य होणार आहे, नाहीतर लायसन्स आणि विम्यावर परिणाम होईल. लायसन रद्द झाल्यानंतर जर तुम्ही वाहन चालविताना अपघात झाला तर विना परवाना वाहन चालविल्याचा आणि अपघातास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा तर दाखल होईलच. परंतु वाहनाच्या नुकसान भरपाईसाठी विमा देखील मिळणार नाही. दंडाची पावती न भरलेल्यांना कोर्टाची नोटीस पाठविली जाते. तिथे सेटलमेंट होते. परंतु, असेही अनेक नग असतात जे या नोटीसलाही जुमानत नाहीत. यामुळे आता मुळावरच घाव घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दंडाची वसुली करण्यासाठी तसेच वाहतुकीचे नियम पाळले जावेत यासाठी हे केले जात आहे. नियमांचा नवीन मसुदा तयार केला जात आहे. यानुसार वाहन मालकांना ३ महिन्यांच्या आत ट्रॅफिक ई-चलन भरावे लागेल, अन्यथा ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले जाऊ शकते.
तसेच ज्या लोकांनी एका आर्थिक वर्षात सिग्नल तोडला किंवा धोकादायक पद्धतीने वाहन चालविल्याची तीन चलन घेतली आहेत.त्यांचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित केले जाणार आहेत. याचबरोबर या प्रस्तावात विम्याचा प्रिमिअमदेखील वाहतूक ई चलन प्रणालीशी जोडला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यानुसार ज्याचे चलन न भरलेले असेल त्याला विम्याची जास्त रक्कम भरावी लागू शकते.
मुंबई(ज्ञानेश सावंत): रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ पावसामुळे मागच्या सामन्यात पंजाब कडून दारुण पराभूत झाला. सुरुवातीचे…
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…