मुंबई : रेशनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवली आहे. त्यातील एक म्हणजे रेशनवर मिळणार मोफत धान्य. या धान्यामुळे अनेक गोरगरिबांच्या पोटाची खळगी भरून निघते. या रेशन कार्डवर नागरिकांना मोफत अन्नधान्य मिळते. यामुळे त्यांचा खर्च कमी होतो. तुमच्या जवळ असलेल्या रेशन दुकानावर जाऊन रेशन कार्ड दाखवून धान्य घेऊ शकतात. यामध्ये गहू, तांदूळ, तेल अशा अनेक गोष्टींचा समावेश आहेत. या गोष्टी तुम्हाला कमी किंमतीत किंवा मोफत मिळतात. मात्र आता काही रेशनधारकांची केवायसी न झाल्यामुळे रेशनकार्ड बंद होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देशातील कोट्यवधी नागरिक केंद्र सरकारच्या मोफत अन्नधान्य योजनेचा लाभ घेत आहेत. ज्या लोकांकडे रेशन कार्ड आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु आता अनेकांचे रेशन कार्ड बंद होणार आहे. ज्या नागरिकांना रेशन कार्ड केवायसी केले नाही त्यांचे कार्ड आता बंद होणार आहे. ही केवायसी करणे अनिवार्य असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे. यासाठी केंद्र सरकारने अंतिम मुदत दिली होती. परंतु केंद्र सरकारकडून ही मुदत ३१ मार्च पर्यंत वाढवून देण्यात आली आहे.
तुमच्या जवळ असलेल्या रेशनच्या दुकानावर जाऊन ही केवायसी तुम्हाला करता येणार आहे. ही केवायसी बायोमेट्रिक पद्धतीची असणारा आहे. बायोमेट्रिक पद्धतीची केवायसी न केल्यास तुमचं रेशन कार्ड आजच बंद होण्याची शक्यता आहे.
मुंबई : प्रभादेवी – कुरणे चौक मार्गावरील बेस्टच्या बस क्रमांक १६७ मधून प्रवास करत असलेल्या…
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक परदेशी दौरे करतात. या दरम्यान ते…
आफ्रिकेच्या सर्वात मोठा तंत्रज्ञान आणि स्टार्टअप शो नवी दिल्ली : गिटेक्स या आफ्रिकेच्या सर्वात मोठ्या…
दिल्लीतल्या गाजलेल्या खटल्यावर आधारित नवीन वेब सिरीज नवी दिल्ली : अभिनेता अली फजल आणि अभिनेत्री…
नाशिक : नाशिक - पुणे मार्गावरील काठे गल्ली सिग्नलजवळ असलेल्या अनधिकृत दर्ग्यावर महापालिका प्रशासनाने कारवाई…
मुंबई : जेईई च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. जेईई मेन सत्र २ची २ ते ८ एप्रिल…