Priya Bapat & Umesh Kamat New Home : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रिया बापट अन् उमेश कामतने घेतलं नवीन घर!

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील आदर्श जोडी म्हणजे प्रिया बापट व उमेश कामत... लग्नाआधी जवळपास ८ वर्षे एकमेकांना डेट केल्यावर २०११ मध्ये प्रिया-उमेशने लग्नगाठ बांधली. मराठमोळ्या पद्धतीत या दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता. हे सेलिब्रिटी कपल चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या जोडीने त्यांच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.


प्रिया व उमेश यांनी हक्काचं नवीन घर घेतलं आहे. अभिनेत्रीने गुढीपाडव्याच्या शुभेच्छा नव्या घरातील फोटो शेअर करत दिल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून प्रिया-उमेशच्या घरी इंटिरियरचं काम चालू होतं. तेव्हापासूनच या जोडप्याचं नवीन घर पाहण्याची चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर गुढीपाडव्याच्या फोटोंमध्ये प्रिया-उमेशच्या नव्या घराची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली आहे.





प्रियाने आठवड्याभरापूर्वीच पोस्ट शेअर करत, “आमच्या नवीन घरातील पहिला गुढीपाडवा” असा उल्लेख केला होता. त्यामुळे या दोघांच्या चाहत्यांनी नव्या घरासाठी दोघांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तिचं नवीन घर पाहण्यासाठी चाहते उत्सुक असल्याच्या कमेंट्स देखील करण्यात आल्या आहेत.


प्रिया-उमेशचं २०११ मध्ये लग्न झाल्यावर या जोडप्याने नवीन घर खरेदी केलं होतं. याबद्दल उमेश कामत जुन्या मुलाखतीत म्हणाला होता, “२०११ साली माझं आणि प्रियाचं लग्न झालं. त्यानंतर आम्ही घर घेतलं. घर घेतल्यावर आमचा बँक बॅलन्स शून्य झाला होता. यानंतर मात्र आर्थिक घडी पुन्हा व्यवस्थित बसवण्यासाठी आम्ही पुन्हा जोमाने काम करु लागलो. पण स्व:कष्टातून मुंबईत स्वत:चं घर घेतल्याचा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही.”




 दरम्यान, प्रिया बापट व उमेश कामत यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर या दोघांनी अनेक चित्रपट व मालिकांमध्ये एकत्र काम केलेलं आहे. सध्या ही जोडी रंगभूमीवरील ‘जर तरची गोष्ट’ या नाटकात एकत्र काम करत आहे.

Comments
Add Comment

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर

Sara Tendulkar : मला माझ्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये हवाय असा गुण... सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरचा मोठा खुलासा!

भारतीय क्रिकेटचा देव मानले जाणारे सचिन तेंडुलकर यांची लाडकी लेक सारा तेंडुलकर ही नेहमीच चाहत्यांच्या आणि सोशल

Govinda On Salman Khan: 'पाटर्नर, तू हिरोसारखा दिसत नाहीस...' गोविंदाचं 'ते' वक्तव्य अन् सलमान खानचं नशीब बदललं

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आपल्या खासगी आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने

Dil Chahta Hai completes 25 years : तरुणाईला वेड लावणारा तो एव्हरग्रीन सिनेमा आणि आजही कायम असलेली 'त्या' गाण्याची क्रेझ!

बॉलीवूडमध्ये काही चित्रपट असे असतात, जे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता प्रेक्षकांच्या आयुष्याचा आणि

AR Rahman Son Accident : प्रसिध्द संगीतकार ए.आर. रहमान यांच्या मुलाचा कार अपघात; थोडक्यात बचावला आमीन

चेन्नई : प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान (A R Rahman) यांचा मुलगा आणि गायक ए.आर. आमीन (A R Ameen) याचा कार अपघात झाल्याची धक्कादायक

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट