Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीNoida Accident Video: मूर्खपणाचा कळस! नोएडात आलिशान लॅम्बोर्गिनीने मजुरांना उडवणाऱ्या चालकाचा अपघातानंतर...

Noida Accident Video: मूर्खपणाचा कळस! नोएडात आलिशान लॅम्बोर्गिनीने मजुरांना उडवणाऱ्या चालकाचा अपघातानंतर प्रश्न!

“मी हळूच एक्सलरेटर दाबला होता, कुणी मेलं का?”

उत्तरप्रदेश : गेल्या काही दिवसांमध्ये बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांमुळे रस्त्यावरून चालणाऱ्या किंवा इतर वाहन चालकांना मनस्ताप किंवा प्रसंगी त्यांच्या जिवावर बेतल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. अगदी बॉलिवुड अभिनेता सलमान खानपासून अशा असंख्य प्रकरणांची यादीच नेहमी चर्चेत येते. आता असंच एक प्रकरण नुकतंच राजधानी दिल्लीजवळील नोएडामध्ये समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे आपल्या आलिशान कारनं रस्त्याच्या कडेच्या बांधकाम मजुरांना उडवल्यानंतर चालकानं “मी तर हळूच एक्सलरेटर दाबला होता, कुणी मेलं का?” असा उलट प्रश्न इतर मजुरांना केला!

नेमकं काय घडलं?

नोएडामध्ये रविवारी संध्याकाळी एका लाल रंगाच्या आलिशान लँम्बोर्गिनी कारने रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या दोन मजुरांना उडवलं. रस्त्याला लागूनच असणाऱ्या एका इमारतीसाठी हे मजूर काम करत होते. नोएडा सेक्टर ९४ मध्ये ही घटना घडली. या अपघातानंतरचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात या कारचा चालक “इथे कुणी मेलंय का?” असा उलट प्रश्न करताना दिसत आहे. पोलिसांनी या चालकाला ताब्यात घेतलं आहे.

अपघात झाल्यानंतर तिथल्या एका मजुराने मोबईलमध्ये संपूर्ण व्हिडीओ चित्रीत केला आहे. यात अपघात झाल्यानंतर हे मजूर कारजवळ गेल्याचं दिसत आहे. मजुरांनी कारचा दरवाजा उघडून आत बसलेल्या चालकाला जाब विचारला. “क्या भाई, स्टंट ज्यादा सीख लिये हो?” असा प्रश्न हे मजूर चालकाला विचारताना दिसत आहेत. तसेच, “तुमको पता हे यहाँ कितने लोग मर गए?” असाही प्रश्न एका मजुरानं विचारला.

चालक अजमेरचा रहिवासी

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात चालकाला अटक केली असून दीपक असं त्याचं नाव आहे. तो अजमेरचा रहिवासी आहे. अपघातात जखमी झालेल्या एका मजुराचा मुलगा गंगाराम याच्या तक्रारीवरून दीपकविरोधात न्यायसंहितेच्या कलम २८१ (बेदरकारपणे वाहन चालवणे) व कलमन १२५ब (मानवी जीविताला धोका) या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिजेन रवी दास (४०) व रंभू कुमार (५०) अशी अपघातात जखमी झालेल्या कामगारांची नावं असून ते छत्तीसगडचे रहिवासी आहेत. या कामगारांवर नोएडा जिल्हा रुग्णालयात उपचार चालू असून दोन्ही मजूरांच्या पायाला फ्रॅक्चर झालं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -