

Ajit Pawar : शरद पवारांचे आमदार अजित पवारांच्या संपर्कात ?
सोलापूर : विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ आमदार निवडून आले तर शरद पवार गटाचे १० आमदार निवडून आले. निवडणूक ...
डॉ. गिरिजा व्यास यांचे बंधू भाई गोपाल शर्मा यांनी घटनेची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. घटना घडली त्यावेळी भाई गोपाल शर्मा फार्म हाऊसवर गेले होते आणि त्यांची बहीण घरीच होती. घरातच पूजा करतेवेळी डॉ. गिरिजा व्यास भाजल्यामुळे गंभीर जखमी झाल्या. घरातील नोकराने डॉ. गिरिजा व्यास यांना रुग्णालयात नेले आणि भाई गोपाल शर्मा यांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच तातडीने परतलेले भाई गोपाल शर्मा यांनी डॉक्टरांनी भेटून डॉ. गिरिजा व्यास यांच्या तब्येतीबाबत माहिती घेतली. नंतर डॉ. गिरिजा व्यास यांना अहमदाबादला नेण्याचा निर्णय झाला. नातलगांनीच परस्पर सहमतीने डॉ. गिरिजा व्यास यांना अहमदाबादला नेले.

IFS Officer Nidhi Tewari Appointed Private Secretary To PM Modi : कोण आहेत पंतप्रधान मोदींच्या खासगी सचिव ? जाणून घ्या
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी सचिव पदावर निधी तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निधी तिवारी २०१४ च्या बॅचच्या भारतीय परराष्ट्र ...
कोण आहेत डॉ. गिरिजा व्यास ?
जन्म : ८ जुलै १९४६
१९८५ - उदयपूरच्या काँग्रेस आमदार
१९९१ - उदयपूरच्या काँग्रेस खासदार आणि नरसिंह राव सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण खात्याच्या उपमंत्री
१९९३ - अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष
१९९३ - १९९६ - पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या सदस्य, गृह आणि परराष्ट्र व्यवहार स्थायी समितीच्या सदस्य
१९९६ - दुसऱ्यांदा खासदार
१९९६ - राजभाषा समितीच्या सदस्य, महिला सक्षमीकरण समितीच्या सदस्य, पेट्रोलियम स्थायी समितीच्या सदस्य, गृह मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या सदस्य
१९९९ - तिसऱ्यांदा खासदार
१९९९ - २००० - पेट्रोलियम आणि रसायने समितीच्या सदस्य
२००१ - २००४ - राजस्थान प्रांतिक काँग्रेस समितीच्या अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मीडिया विभागाच्या अध्यक्ष आणि इंडो-ईयू सिव्हिल सोसायटीच्या सदस्य
२००५ - २०११ - राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष
२००८ - राजस्थान विधानसभेच्या आमदार
२०१३ - गृहनिर्माण आणि शहरी दारिद्र्य निर्मूलन मंत्री