Ulhasnagar Metro : आता उल्हासनगरमध्ये धावणार मेट्रो! खडकपाडा ते उल्हासनगर असा मेट्रो-५ चा विस्तार

मुंबई : उल्हासनगरला राहणाऱ्या नागरिकांना मुंबईत येण्यासाठी लोकल ट्रेन शिवाय पर्याय नाही. रस्तेमार्गे मुंबईत येणे खूप वेळखाऊ तर आहेच पण त्याचबरोबर पैसेदेखील अधिक मोजावे लागतात. मात्र आला लवकरच उल्हासनगरच्या नागरिकांचा (Ulhasnagar Metro) प्रवास सोप्पा होणार आहे. कारण लवकरच उल्हासनगरमध्ये मेट्रो धावणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ही माहिती दिली आहे.



ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-५ (Metro 5) मार्गिकेचा विस्तार आता कल्याण ऐवजी उल्हासनगर पर्यंत असणार आहे. खडकपाडा ते उल्हासनगर असा मेट्रोचा विस्तार होणार आहे. २०२४-२५ वर्षासाठीच्या अर्थसंकल्पानुसार मेट्रो 5चा कल्याण-खडकपाडा आणि खडकपाडा-उल्हासनगर अशा ७.७ किमीच्या विस्तारीत मार्गिकेच्या कामासा सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानुसार अर्थसंकल्पात यासंबंधीची तरतूद करुन या विस्तीरीकरणाच्या कार्यवाहीला सुरूवात करण्यात येणार आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गिका २४.९ किमी लांबीची आणि साडेआठ हजार कोटी खर्चाची मार्गिका आहे. या मार्गिकेवर १७ मेट्रो स्थानके असून ठाण्यापासून मेट्रो सुरू होणार आहे. सुरूवातीच्या आराखड्यानुसार मेट्रो ठाण्याला सुरू होऊन कल्याणपर्यंत धावणार होती. मात्र आता मेट्रोचा विस्तार होऊन थेट खडकपाडा ते उल्हासनगर पर्यंत मेट्रो जाणार आहे.


लवकरच या मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात ठाणे-भिवंडी टप्प्याचे काम हाती घेण्यात आली आहे. मेट्रो प्रकल्प मार्ग ५ ठाणे - भिवंडी कल्याणसाठी १,५७९.९९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पात याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता उल्हासनगर, विरार, बदलापूर हा परिसरही मेट्रोने जोडला जाणार आहे. दरम्यान अर्थसंकल्पात मेट्रोसह अनेक पायाभूत प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करत एमएमआरडीएने एमएमआरच्या भविष्याचा आराखडा मांडला असल्याची प्रतिक्रिया यानिमित्ताने महानगर आयुक्त डाॅ.संजय मुखर्जी यांनी दिली.

Comments
Add Comment

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे