मुंबई : उल्हासनगरला राहणाऱ्या नागरिकांना मुंबईत येण्यासाठी लोकल ट्रेन शिवाय पर्याय नाही. रस्तेमार्गे मुंबईत येणे खूप वेळखाऊ तर आहेच पण त्याचबरोबर पैसेदेखील अधिक मोजावे लागतात. मात्र आला लवकरच उल्हासनगरच्या नागरिकांचा (Ulhasnagar Metro) प्रवास सोप्पा होणार आहे. कारण लवकरच उल्हासनगरमध्ये मेट्रो धावणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ही माहिती दिली आहे.
Alphanso Mango : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हापूस आंब्याची यूरोप,अमेरिका स्वारी!
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-५ (Metro 5) मार्गिकेचा विस्तार आता कल्याण ऐवजी उल्हासनगर पर्यंत असणार आहे. खडकपाडा ते उल्हासनगर असा मेट्रोचा विस्तार होणार आहे. २०२४-२५ वर्षासाठीच्या अर्थसंकल्पानुसार मेट्रो 5चा कल्याण-खडकपाडा आणि खडकपाडा-उल्हासनगर अशा ७.७ किमीच्या विस्तारीत मार्गिकेच्या कामासा सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानुसार अर्थसंकल्पात यासंबंधीची तरतूद करुन या विस्तीरीकरणाच्या कार्यवाहीला सुरूवात करण्यात येणार आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गिका २४.९ किमी लांबीची आणि साडेआठ हजार कोटी खर्चाची मार्गिका आहे. या मार्गिकेवर १७ मेट्रो स्थानके असून ठाण्यापासून मेट्रो सुरू होणार आहे. सुरूवातीच्या आराखड्यानुसार मेट्रो ठाण्याला सुरू होऊन कल्याणपर्यंत धावणार होती. मात्र आता मेट्रोचा विस्तार होऊन थेट खडकपाडा ते उल्हासनगर पर्यंत मेट्रो जाणार आहे.
लवकरच या मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात ठाणे-भिवंडी टप्प्याचे काम हाती घेण्यात आली आहे. मेट्रो प्रकल्प मार्ग ५ ठाणे – भिवंडी कल्याणसाठी १,५७९.९९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पात याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता उल्हासनगर, विरार, बदलापूर हा परिसरही मेट्रोने जोडला जाणार आहे. दरम्यान अर्थसंकल्पात मेट्रोसह अनेक पायाभूत प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करत एमएमआरडीएने एमएमआरच्या भविष्याचा आराखडा मांडला असल्याची प्रतिक्रिया यानिमित्ताने महानगर आयुक्त डाॅ.संजय मुखर्जी यांनी दिली.