Nepal : नेपाळमध्ये राजेशाहीच्या मागणीसाठी हिंसक आंदोलन, आंदोलकांची धरपकड

काठमांडू : नेपाळमध्ये फेब्रुवारी २०२५ मध्ये सरकारी निर्देशांनुसार लोकशाही दिन साजरा करण्यात आला. यानंतर नेपाळमध्ये राजेशाहीच्या मागणीसाठी हिंसक आंदोलन झाले. मागील काही दिवसांपासून नेपाळमध्ये वेगवेगळ्या वर्गांमध्ये राजेशाहीची मागणी जोर धरू लागली आहे. मागणी करणाऱ्यांची संख्या वाढली आणि नेपाळमध्ये सरकार विरोधात हिंसक आंदोलन झाले. नेपाळ सरकारने हिंसक आंदोलकांना आळा घालण्यासाठी लष्कराची मदत घेतली आहे. काठमांडूत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आंदोलकांची धरपकड सुरू आहे. तर आंदोलकांनी नेपाळ सरकारला ३ एप्रिल पर्यंत राजेशाही आणा नाहीतर परिणाम भोगा, असा इशारा दिला आहे.



हिंसक आंदोलनात सार्वजनिक संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हेच कारण पुढे करुन नेपाळ सरकार पदच्युत राजे ज्ञानेंद्र शाह यांच्या विरोधात कारवाई करण्याची तयारी करत आहे. पदच्युत राजे ज्ञानेंद्र शाह यांनीच फूस लावल्यामुळे हिंसक आंदोलन सुरू असल्याचा आरोप नेपाळ सरकारने केला आहे. दंगलीतील सार्वजनिक संपत्तीच्या हानीची भरपाई म्हणून नेपाळ सरकारने पदच्युत राजे ज्ञानेंद्र शाह यांना सात लाख ९३ हजार नेपाळी रुपये एवढा दंड भरण्याचे निर्देश दिले आहेत. दंड भरण्यासाठी पदच्युत राजे ज्ञानेंद्र शाह यांना नेपाळ सरकारने नोटीस बजावली आहे. पैसे विहित मुदतीत सरकारकडे जमा केले नाही तर पदच्युत राजे ज्ञानेंद्र शाह यांचा पासपोर्ट जप्त करुन रद्द केला जाईल; असे संकेत नेपाळ सरकारने दिले आहेत.

नेपाळमध्ये २००८ मध्ये २४० वर्षांची हिंदू राजाची राजवट संपुष्टात आली. राजेशाही संपल्यापासून नेपाळमध्ये लोकशाही व्यवस्था राबवण्यास सुरुवात झाली आहे. राजाची राजवट संपल्यापासून नेपाळमधील भ्रष्टाचारात वाढ झाली आहे. नेपाळमधील बेरोजगारांचा प्रश्न अधिकाधिक गंभीर होऊ लागला आहे. तरुण पिढीत सत्ताधाऱ्यांविषयीची नाराजी वाढत आहे. या नाराजीतूनच नेपाळमध्ये राजेशाहीची मागणी जोर धरू लागली आहे.
Comments
Add Comment

कोमातील मुलीला शुद्धीवर आणण्यासाठी आईची ‘डान्स थेरपी’

बीजिंग : चीनमधील एका आईने आपल्या कोमात असलेल्या मुलीला १० वर्षे रोज नृत्य करवून चमत्कारिकरीत्या बरे केले आहे.

स्थानिकांच्या रोजगारासाठी ट्रम्प यांचे नवीन ‘एच-१ बी’ व्हिसा धोरण

विधेयक मंजूर झाल्यास ७० टक्के भारतीयांना फटका बसण्याची भीती न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : अमेरिकेच्या

पाकिस्तानात ‘सुप्रीम’चे न्यायाधीश लष्करप्रमुखांच्या विरोधात

इस्लामाबाद : पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने बंड केले आहे. मन्सूर अली

शटडाऊन संपल्याने १४ लाख अमेरिकन लोकांना पगार मिळणार

वॉशिंग्टन  : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सरकारी निधी विधेयकावर स्वाक्षरी केल्यामुळे ४३

चीनची मोठी झेप! ऑनर आणणार जगातील पहिला AI Robot Phone, जाणून घ्या खास फीचर्स

बीजिंग – तंत्रज्ञानाच्या विश्वात मोठा बदल घडवणारी बातमी चीनमधून समोर आली आहे. चीनची प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स

जागतिक नेमबाजी स्पर्धेत सम्राट राणाला सुवर्णपदक

कैरो : कर्नालचा युवा नेमबाज सम्राट राणा याने जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. सोमवारी,