मुंबई : सध्या सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर ‘घिबली (Ghibli) इमेज’चा ट्रेंड सुरु झाला आहे. अनेकजण ओपन एआयच्या चॅटजीपीटी (Chat Gpt) आणि एक्स वरील ग्रोक प्लॅटफॉर्मच्या मदतीने घिबली स्टाईल फोटो (Ghibli Style image) बनवून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. राजकारण्यासह अनेक अभिनेते देखील या ट्रेंडमध्ये सहभागी होत फोटो शेअर केले जात आहेत. मात्र आता घिबली इमेज चाहत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (Chat Gpt Down)
ओपनएआयच्या चॅटजीपीटीमध्ये जागतिक स्तरावर आउटेज (Chat Gpt Down) येत आहे, ज्यामुळे स्टुडिओ घिबली फोटो तयार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वापरकर्त्यांनाही अडथळा येत आहे. त्यांच्या अॅप आणि एपीआय सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळल्या आहेत. ओपनएआयच्या चॅटजीपीटीच्या अपडेटमुळे स्टुडिओ घिबली फोटोमध्ये तुफान वाढ झाली आहे, त्यामुळे चॅटजीपीटी सेवा ठप्प झाली असल्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे.
ओपन एआयने (Open AI) अधिकृतपणे ही समस्या मान्य केली असून “आम्हाला सध्या समस्या येत आहेत”, तसेच “आम्हाला असे आढळून आले आहे की प्रभावित सेवांमध्ये वापरकर्त्यांना अडथळे येत आहेत. अडथळ्याचं लवलरच निराकरण केलं जाईल’ असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, चॅट जीपीटी डाऊन झाल्यामुळे अनेक ५९ टक्के वापरकर्त्यांनी चॅटजीपीटीशी संबंधित तक्रारी केल्या आहेत.
चॅटजीपीटीमध्ये स्टुडिओ घिबली-शैलीतील (Ghibli) प्रतिमा निर्मितीच्या परिचयाने जगभरातील वापरकर्त्यांना मोहित केले आहे. ज्यामुळे त्यांना सामान्य फोटोंचे रूपांतर प्रतिष्ठित जपानी अॅनिमेशन स्टुडिओपासून प्रेरित होऊन मोहक दृश्यांमध्ये करता आले आहे.
चॅटजीपीटीवर यूजर त्यांचा आवडता फोटो अपलोड करून कनव्हर्ट दिस इमेज इन टू घिबली असे लिहिताच काही क्षणांतच घिबली शैलीतील छायाचित्रे मिळवता येतात. ‘एआय’द्वारे त्याचे रूपांतर जपानी ॲनिमेशनच्या क्लासिक घटकांत रूपांतरित केले जाते. त्यामुळे आठवणी या कलाकृतीचे रूप घेतात. हा ट्रेंड केवळ ओपन-एआयपुरता मर्यादित नाही, तर ग्रोक आणि जेमिनी या एआय प्लॅटफॉर्मनीही ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
चेपॉक: चेन्नईच्या चेपॉक मैदानावर आज कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नईला ८ विकेटनी हरवले. चेन्नईने कोलकत्त्यासमोर विजयासाठी…
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून त्याचा थेट फटका हा शाळकरी विद्यार्थ्यांना…
खासदार नारायण राणे यांचे जनतेला आवाहन कणकवली : वैभववाडी कोल्हापूर हा रेल्वे मार्ग लवकरच सुरू…
कासगाव-मोरबे-मानसरोवर या नवीन रेल्वेमार्गाच्या निर्मितीला मंजुरी मुंबई : मध्य रेल्वेच्या बदलापूर आणि वांगणी स्थानकांदरम्यान लवकरच…
मनमाड ते कसारा या नव्या रेल्वेमार्गाला मिळाली मंजुरी मुंबई : मुंबई ते नाशिक दरम्यान हजारो…
कोल्हापूर : गुलाल खोबऱ्याची मुक्त उधळण आणि ‘ज्योतिबाच्या नावाने चांगभल’च्या गजराने दख्खनचा राजा ज्योतिबाच्या यात्रेला…