Monday, April 21, 2025
HomeदेशRailway Accident : बंगळुरू - कामाख्या एक्सप्रेस घसरली, रुळावरुन ११ डबे उतरले

Railway Accident : बंगळुरू – कामाख्या एक्सप्रेस घसरली, रुळावरुन ११ डबे उतरले

नवी दिल्ली : ओडिशातील कटक जिल्ह्यात बंगळुरू – कामाख्या एसी सुपरफास्ट एक्सप्रेसचे ११ डबे रुळावरुन खाली घसरले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आणि सात जण जखमी झाले. मदतकार्य सुरू आहे. अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले आहेत.

मणिपूर, नागालँड आणि अरुणाचलमध्ये AFSPA आणखी सहा महिने वाढवला

जखमींवर एससीबी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Governor Haribhau Bagde : हेलिकॉप्टर अपघातातून राज्यपाल हरिभाऊ बागडे थोडक्यात बचावले

खुर्दा रोड विभागांतर्गत कटक – नारगुंडी रेल्वे विभागातील नारगुंडी स्थानकाजवळ रविवार ३० मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजून ५४ मिनिटांनी अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.

Crime : बीडमध्ये मशिदीत स्फोट, स्फोटाआधीचे आरोपीचे रील Viral

प्रशासनाने पूर्व विभागातील रेल्वे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचे काम हाती घेतले आहे. तंत्रज्ञांच्या मदतीने रुळ दुरुस्त करुन रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हेल्पलाईन क्रमांक : ८४५५८८५९९९ आणि ८९९११२४२३८

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -