Thursday, April 17, 2025
Homeदेशमणिपूर, नागालँड आणि अरुणाचलमध्ये AFSPA आणखी सहा महिने वाढवला

मणिपूर, नागालँड आणि अरुणाचलमध्ये AFSPA आणखी सहा महिने वाढवला

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या ईशान्य भारतातील तीन राज्यांसाठी सशस्त्र दल विशेष अधिकार कायद्याचा (Armed Forces Special Powers Act or AFSPA) कालावधी आणखी सहा महिने वाढवला. यामुळे मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये आणखी काही काळ सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा, १९५८ (२८ वा मुद्दा) च्या कलम ३ द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर केला जाणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी झाली आहे.

Crime : बीडमध्ये मशिदीत स्फोट, स्फोटाआधीचे आरोपीचे रील Viral

केंद्र सरकारने मणिपूरमधील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला. यानंतर मणिपूरमधील पाच जिल्ह्यांतील इम्फाळ, लामफेल, सिटी, सिंगजामेई, पतसोई, वांगोई, पोरोमपत, हिंगांग, इरिलबुंग, थौबल, बिष्णुपूर, नंबोल आणि काकचिंग पोलिस ठाण्याच्या हद्दीत सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा लागू नसेल असे जाहीर केले. उर्वरित मणिपूरमध्ये सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा लागू असेल. तसेच नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांतही सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा लागू असेल.कायद्यामुळे केंद्राच्या मान्यतेशिवाय अशांत भागात काम करणाऱ्या सशस्त्र दलांना व्यापक अधिकार आणि खटल्यापासून मुक्तता मिळेल.

Governor Haribhau Bagde : हेलिकॉप्टर अपघातातून राज्यपाल हरिभाऊ बागडे थोडक्यात बचावले

फुटीरतावादी अतिरेक्यांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या ईशान्य भारतातील तीन राज्यांमध्ये सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा लागू आहे. या कायद्यामुळे सुरक्षा पथकांना विशेषाधिकार मिळाले आहेत. या अधिकारांमुळे ते वॉरंटशिवाय अटक करू शकतात तसेच विशिष्ट परिस्थितीत गोळीबार करू शकतात. मणिपूर आणि नागालँडमध्ये १९५८ पासून तर अरुणाचल प्रदेशमध्ये १९७२ पासून सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा लागू आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -