मुंबई : प्रवासी कृपया लक्ष द्या. रविवार ३० मार्च २०२५ रोजी गुढी पाडवा आहे. नेमक्या याच दिवशी देखभाल दुरुस्तीसाठी मुंबई उपनगरीय रेल्वेचा मेगाब्लॉक आहे. रेल्वे प्रशासन सेवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी दररोज मध्यरात्री तसेच दर रविवारी मेगाब्लॉक काळात मोठ्या प्रमाणावर देखभाल दुरुस्ती करते. या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या व्यवस्थेला अनुसरुन रविवारी मेगाब्लॉक घेणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. प्रवाशांनी मेगाब्लॉकची माहिती घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
पश्चिम रेल्वे मार्ग, मध्य रेल्वे मुख्य मार्ग अर्थात मेन लाईन आणि मध्य रेल्वे हार्बर मार्ग येथे रविवार ३० मार्च २०२५ रोजी मेगाब्लॉक आहे. मेगाब्लॉक काळात अनेक लोकल फेऱ्या रद्द केल्या जातील तसेच काही लोकल फेऱ्यांमध्ये बदल केला जाईल.
मध्य रेल्वे मुख्य मार्ग
ठाणे ते कल्याण
जाणाऱ्या आणि येणाऱ्या धीम्या मार्गावर
सकाळी ११ ते संध्याकाळी ४ मेगाब्लॉक
धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळवणार, काही गाड्या रद्द करणार तर काही गाड्या १५ ते २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
मध्य रेल्वे हार्बर मार्ग
कुर्ला ते वाशी
जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गावर
सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० मेगाब्लॉक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी/बेलापूर/पनवेलदरम्यान धावणाऱ्या जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गावरील गाड्या रद्द. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी मार्गावर विशेष गाड्या धावतील.
पश्चिम रेल्वे मार्ग
सांताक्रुझ ते माहिम
जाणाऱ्या आणि येणाऱ्या धीम्या मार्गावर
रविवार ३० मार्च रोजी मध्यरात्री १२.३० ते पहाटे ४.३० मेगाब्लॉक
जाणाऱ्या आणि येणाऱ्या धीम्या मार्गावरील जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. लोअर परळ, माहीम आणि खार रोड स्थानकांवर दुहेरी थांबा देण्यात येणार आहे. महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड येथे फलाट अनुपलब्धतेमुळे लोकल थांबणार नाही. ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही विलंबाने धावणार आहेत. रात्रकालीन ब्लॉकमुळे रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…