
अमरावती : गेल्या आठ दिवसांपासून तापमान ३९अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक आहे. त्याचा परिणाम फळबागा व भाजीपाल्यावर होत आहे. उत्पादनात घट होत असल्याने शेतकरी अडचणीत आहेत. भाजीपाला व लिंबू महाग होणार आहेत. उष्णतेमुळे पिकांचे नुकसान कमी करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी उपाययोजना करणे शेतकऱ्यांना आवश्यक आहे.
अमरावती जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच वातावरणात बदल होत आहे. त्यामुळे आजारपणात वाढ झाली होती. सध्या व्हायरल कमी झाले असले तरी पिकांवर संकट येऊ घातले आहे. गहू काढण्यात आला असला तरी कांदा अजून बाकी आहे. फळबागा व भाजीपाला सध्या लागवड केलेले आहेत. यात प्रामुख्याने वांग्याचा समावेश आहे. लग्न सराईचे दिवस येत असल्याने वांग्याची मागणी अधिक असते. मात्र या वांग्यावर उष्णतेचा परिणाम होत असून चवही लागत नाही.

मुंबई : राज्यात उन्हाचा तडाका प्रचंड वाढला आहे. उष्णतेच्या या लाटेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात ...
ऊन्हाचा भाज्यांना फटका बसत आहे. उन्हाळ्यातील ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असलेले कमाल तापमान व कमी झालेली आर्द्रता पेरू फळबागेतील फळधारणा योग्य रीतीने होण्यास बाधक ठरते व त्यामुळे फळगळ होऊन एकंदरीत उत्पादनात घट येऊ शकते. म्हणून उच्च तापमानापासून संरक्षण म्हणून फळबागेत सेंद्रिय आच्छादनांचा वापर करावा.
सध्याच्या वाढत्या तापमानाची कक्षा लक्षात घेऊन कांदा पिकाला ४ ते ५ दिवसांच्या अंतराने ओलीत करावे तसेच ओलीत करताना ते प्राधान्याने सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेत करावे. मनीषकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भुजल पातळीत घट तापमान वाढत असल्याने भूजल पातळी खालावत आहे. त्यामुळे पिकांना, भाजीपाला पिकांना, फळबागांना ओलीत करताना प्राधान्याने ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर सुरू झाला.