नागरकुरलून : तेलंगणातील श्रीशैलम येथून नागरकुरलूनकडे जात असताना आयपीएस सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन झालं आहे. देवदर्शनासाठी गेले असता पठारे यांच्या कारचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात परभणी येथील कंत्राटदार भागवत खोडके यांचाही मृत्यू झाला आहे. हे दोघे ज्या गाडीतून प्रवास करत होते त्या गाडीची ट्रकसोबत धडक झाली आणि हा अपघात झाला. सुधाकर पठारे हे २०११ बॅचचे आयपीएस अधिकारी असून पठारे यांच्या निधनाने महाराष्ट्र पोलिस दलावर शोककळा पसरली आहे.
Earthquake: म्यानमार भूकंपामध्ये मृ्त्यूमुखी पडलेल्यांची संख्या १६००वर
आयपीएस सुधाकर पठारे यांच्यावर सध्या मुंबई पोलिसात पोर्ट झोनचे डीसीपी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. पठारे हे काही काळापूर्वी ट्रेनिंगसाठी हैदराबादमध्ये गेले होते. तिथं त्यांच्या एका नातेवाईकासह ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला. अपघातात सुधाकर पठारे यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक असलेल्या भागवत खोडके यांचाही मृत्यू झाला.
सुधाकर पठार हे स्पर्धा परीक्षा देत असताना १९९५ साली जिल्हा विशेष लेखा परीक्षक झाले. यानंतर १९९६ मध्ये विक्रीकर अधिकारी वर्ग म्हणून त्यांची निवड झाली. तसंच नंतर १९९८ साली पोलिस उपअधीक्षक म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर पोलिस खात्यातच ते रमले. आतापर्यंत त्यांनी पोलिस उपअधीक्षक म्हणून पंढरपूर, अकलूज, कोल्हापूर शहर, राजुरा येथे काम केले आहे.