Tuesday, April 29, 2025
Homeमहत्वाची बातमीEarthquake: म्यानमार भूकंपामध्ये मृ्त्यूमुखी पडलेल्यांची संख्या १६००वर

Earthquake: म्यानमार भूकंपामध्ये मृ्त्यूमुखी पडलेल्यांची संख्या १६००वर

नवी दिल्ली: म्यानमार आणि थायलंडमध्ये शुक्रवारी आलेल्या भूकंपाने मोठा हाहाकार माजवला आहे. शनिवारीही भूकंपाचे झटके जाणवले. शनिवारी दुपारी भूकंपाची तीव्रता ५.१ रिश्टर स्केल इतकी होती. भारताने भूकंपाचा धक्का बसलेल्या म्यानमार आणि थायलंडच्या मदतीसाठी ऑपरेशन ब्रम्हा अंतर्गत मेडिकल टीम पाठवली आहे. म्यानारमध्ये भूकंपामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १६४४ वर पोहोचली आहे.

भारताचे ऑपरेशन ब्रम्हा

म्यानमारमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. भारत सातत्याने बचावकार्य करत आहे. भारताने संवेदना प्रकट करताना शक्य होईल तितके मदतीचे आश्वासन दिले आहे. भारताने ऑपरेशन ब्रम्हा अंतर्गत स्पेशल मेडिकल टास्क फोर्स बचाव कार्यासाठी तैनात केले आहे.

लेफ्टनंट कर्नल जगनीत गिलच्या नेतृत्वात ११८ सदस्यीय मेडिकल टीम म्यानमारसाठी रवाना झाली आहे. ही टीम एअरबोर्न एंजल्स टास्क फोर्सचा भाग आहे.

शुक्रवारी चीन, म्यानमार, थायलंड आणि भारतात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. म्यानमारमध्ये पहिला भूकंप १२.५० वाजता आला. याची तीव्रता ७.७ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदु म्यानमारच्या सागाईंग शहराच्या जवळ पृथ्वीच्या १० किमी खोल होता. युनायटेड स्टेटस जिओलॉजिकल सर्व्हेने सांगितले की १२ मिनिटांनंतर दुसरा भूकंप आला. याची तीव्रता ६.४ इतकी होती. या भूकंपानंतर म्यानमार आणि थायलंडमध्ये जनजीवत पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -