पंतप्रधान मोदींच्या माध्यमातून भारताला महान पंतप्रधान मिळाला

कर धोरणावर भूमिका स्पष्ट करताना ट्रम्प यांनी केली प्रशंसा


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच अमेरिका दौऱ्यावर आले होते. आम्ही दोघे खूप चांगले मित्र आहोत. ते खूप स्मार्ट व्यक्ती आहेत आणि ते माझे खूप चांगले मित्र आहेत. आम्हा दोघांमध्ये खूप चांगली चर्चा झाली. मला आशा वाटते की भारत आणि अमेरिकेच्या द्विपक्षीय चर्चेतून चांगले काहीतरी समोर येईल. तसेच मी असे म्हणू इच्छितो की तुम्हाला एक महान पंतप्रधान मिळाला असल्याचे सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदी यांची प्रशंसा केली.


डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या उच्च कर धोरणाबद्दल त्यांच्या भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. अमेरिका भारतासह इतर देशांवर परस्पर शुल्क लागू करण्याच्या तयारीत आहे. यामुळे व्यापार युद्धाची भीती व्यक्त केली जात आहे. जरी भारताच्या प्रशासनाने भारतीय उत्पादनांवर परस्पर शुल्क लागू करण्यावर जोर दिला असला तरी दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या द्विपक्षीय व्यापार चर्चेतून सकारात्मक तोडगा निघेल, असा विश्वास ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.



ते पुढे असेही म्हणाले, भारताशी आमचे द्विपक्षीय संबंध खूप चांगले आहेत. मला आशा आहे की ते कदाचित कर लक्षणीयरीत्या कमी करण्याचा निर्णय घेतील. पण आम्ही २ एप्रिल रोजी, आम्हाला जो कर आकारला जातो तेवढाच कर आम्ही त्या देशांवर लागू करु. तुम्ही भारतात काहीही विकू शकत नाही. त्याला काही निर्बंध आहेत. फेब्रुवारीपासून भारताने अमेरिकेसोबत द्विपक्षीय व्यापारी संबंध आणखी मजबूत करण्यावर भर दिला आहे. शुल्क धोरणावरुन सुरु झालेला संघर्ष कमी करण्याचा यामागील उद्देश आहे.

Comments
Add Comment

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार

दहशतवाद्यांनी बर्फवृष्टीचा फायदा घेऊन घुसखोरी करू नये , सुरक्षा दलांनी सज्ज रहावे - अमित शाह

नवी दिल्ली : “केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधातील “शून्य सहनशीलता” धोरण पुढेही कायम राहणार आहे”, असे केंद्रीय

मोठा अपघात टळला; फर्रुखाबादमध्ये खाजगी विमानाचा अपघात

फर्रुखाबा : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथील विमान तळावर आज सकाळी एका खासगी विमानाचा

विषारी कफ सिरपमुळे २३ चिमुरड्यांचा मृत्यू, कंपनीच्या संचालकाला अटक

नवी दिल्ली : श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली.

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११