Wednesday, April 23, 2025
Homeब्रेकिंग न्यूजउद्धव ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये : मंत्री नितेश राणे

उद्धव ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये : मंत्री नितेश राणे

कणकवली : हिंदुत्वाच्या मुद्दयावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सातत्याने टीका करत आहेत. पण भगव्याचा द्वेष करणाऱ्या आणि हिरव्याचे लांगुल चालन करणाऱ्या ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, असा टोला पालकमंत्री नितेश राणे यांनी लगावला. कणकवली येथील प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) बोलत होते.

नितेश राणे म्हणाले, भाजपा पक्षाच्या झेंड्यातील हिरवा रंग ठाकरेंना खुपतोय. तो काढावा, अशी ते मागणी करत आहेत. पण आमचा झेंडा कसा दिसावा, याची चिंता उद्धव ठाकरेंनी करू नये. आता भगवा आणि ठाकरे यांचा काहीही संबंध राहिलेला नाही. मुख्यमंत्री होवूनही ठाकरेंना संविधानिक प्रक्रियांची माहिती नाही. विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवल्यावरून ते टीका करत आहेत. वस्तुत: जो कायदा देशाला तोच राज्याला लागू होतो. संसदेमध्ये विरोधकांकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने संसदेत विरोधी पक्ष नेता नव्हता. तशीच स्थिती राज्यात आहे. पण ठाकरेंना कायद्याचा कोणताही अभ्यास नाही. देशात, राज्यात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. या सर्व हिंसाचारामधील आरोपी हे एकाच धर्माचे आहेत. त्यामुळेच आम्ही त्या विरोधात आवाज उठवत आहोत. आम्हाला हिंदूत्व शिकवणाऱ्यांनी कधी त्या धर्मातील उन्मादींना संविधान शिकवले आहे का? त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केलंय का? हे आधी तपासून पहावे, असे मंत्री नितेश राणे म्हणाले.

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांची ‘दिलखुलास’ ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री अजित पवार यांनी यंदाचा प्रभावी अर्थसंकल्प मांडला आहे. आमचे राज्य प्रगतशील राज्य म्हणून अधिक भक्कमपणे पुढे जाणार आहे. राज्य हिताचे जे मुद्दे, विधेयक मांडण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. या उलट विरोधी पक्षांत ताळमेळ राहिलेला नाही. राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून विरोधक अपयशी ठरले आहे. जनतेने आम्हाला जनमताचा मोठा कौल दिला आहे. त्यामुळे आगामी पाच वर्षात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर दिसेल. जिल्हा परिषदेचा निधी खर्च करण्यामध्ये काही अधिकाऱ्यांनी थोडा कंटाळा दाखवला. योग्य नियोजन केलं नाही. पण त्यांना आम्ही समज दिली , त्यांना शासन केले गेले. ज्या गोष्टी चौकटीत बसत नव्हत्या. त्यामध्ये आम्ही सुधारणा करून निधी योग्य पद्धतीने खर्च केला. जिल्ह्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी योग्य नियोजन आम्ही केले आहे, असेही मंत्री नितेश राणे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -