म्यानमार : म्यानमार आणि थायलंडमध्ये शुक्रवार २८ मार्च रोजी सकाळी भूकंप झाला. भूगर्भतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, म्यानमारमध्ये ७.९ रिश्टर आणि थायलंडमध्ये ७.७ रिश्टर क्षमतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाचे धक्के उत्तर भारतात दिल्ली, नोएडा, गाझियाबादपर्यंत जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारमध्ये होता.
म्यानमारमधील सागाइंग प्रांतात जमिनीपासून १० किलोमीटर खाली भूकंपाचा केंद्रबिंदू होता. अचूक सांगायचे तर सागाइंग शहराच्या १६ किलोमीटर वायव्येला १० किलोमीटर खोलीवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपामुळे अनेक लहान – मोठ्या इमारतींची पडझड झाली. अनेक इमारती कोसळल्या. अनेकांनी रस्त्यावर येऊन मोकळ्या जागेत उभे राहून स्वतःला वाचवले.
भूकंपामुळे अनेक उंच इमारतींमधील पाण्याच्या टाक्या फुटल्या. धबधब्यातून पाणी कोसळत असते तशा प्रकारे टाकीतले पाणी वेगाने उंचावरुन जमिनीवर आले. पाठोपाठ टॉवर कोसळले किंवा त्यांची पडझड झाली. अनेक ठिकाणी नागरिक इमारतींच्या ढिगाऱ्यात दबले आहेत. पडझड झालेल्या इमारतींमध्ये अडकले आहेत. जीवितहानीची नेमकी आकडेवारी अद्याप समजलेली नाही. पण आकडा मोठा असेल अशी भीती व्यक्त होत आहे.
प्राथमिक आकडेवारीनुसार, चीनमध्येही दोन जण भूकंपामुळे जखमी झाले आहेत. जखमींच्या आणि मृतांच्या आकडेवारीत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे.
भूकंपानंतर म्यानमार आणि थायलंडमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. मदतकार्य सुरू आहे. थायलंडमध्ये ग्रेटर बँकॉकला भूकंपाचा मोठा फटका बसला आहे. म्यानमारमध्ये मंडाले आणि आसपासच्या शहारांना भूकंपाचा मोठा फटका बसला आहे.
म्यानमारमध्ये स्थिती:
म्यानमारमध्ये या भूकंपामुळे किमान १४४ लोकांचा मृत्यू झाला असून, ७०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. सागाइंग प्रदेशात भूकंपाचा केंद्रबिंदू होता, ज्यामुळे या भागात सर्वाधिक नुकसान झाले आहे. सत्ताधारी जुंटाने आंतरराष्ट्रीय मानवीय मदतीसाठी विनंती केली आहे आणि सहा प्रदेशांमध्ये आणीबाणी घोषित केली आहे.
थायलंडमध्ये स्थिती:
थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भूकंपामुळे ३० मजली बांधकामाधीन इमारत कोसळली, ज्यामुळे किमान तीन कामगारांचा मृत्यू झाला आणि ८१ हून अधिक जण मलब्याखाली अडकले आहेत. बचावकार्य सुरू असून, अधिकारी सतत परिस्थितीचे निरीक्षण करत आहेत.
इतर देशांवर परिणाम:
या भूकंपाचे झटके भारतातील कोलकाता, इम्फाळ आणि मेघालयच्या ईस्ट गारो हिल्स जिल्ह्यातही जाणवले. बांगलादेश आणि चीनच्या युनान प्रांतातही भूकंपाचे प्रभाव जाणवले आहेत.
भारतीय दूतावासाची मदत:
थायलंडमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांक जारी केला आहे: +66 618819218. भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याची आणि आवश्यक असल्यास दूतावासाशी संपर्क साधण्याची विनंती करण्यात आली आहे.
सध्याची स्थिती:
दोन्ही देशांमध्ये बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असून, प्रशासन सतत परिस्थितीचे निरीक्षण करत आहे.
मुंबई:‘अशी ही बनवाबनवी’, ‘झपाटलेला’, ‘धडाकेबाज’, ‘अफलातून’, ‘हमाल दे धमाल’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘प्यार किया तो…
नवी मुंबई : सार्वजनिक सुट्ट्या जोडून आल्या की शासकीय कर्मचारी सहलीसाठी पळ काढतात अथवा गावी…
पुणे : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई - पुणे महामार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमंडली…
मुंबई : देशभरात नावाजलेली व्हीआय (Vodafone Idea) या प्रमुख दूरसंचार कंपनीने भारतात टप्प्याटप्प्याने 5G सेवा…
अवघ्या ४ वर्षांच्या मुलीला मरणाच्या दारातून परत आणले मुंबई : टाटा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी ४ वर्षाच्या…
मुंबई : महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी, बारावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट आहे. दरवर्षी महाराष्ट्र बोर्डाचे बारावीचे निकाल…