चेन्नई: चेपॉकच्या मैदानावर विराट कोहलीच्या बंगळुरूने चेन्नई सुपरकिंग्सला विजयासाठी रॉयल चॅलेंज दिले आहे. चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २० षटकांत ७ बाद १९६ धावा केल्या आहेत. बंगळुरूच्या टीम डेविडने शेवटच्या षटकांत झळकावलेल्या ३ षटकारांच्या जोरावर बंगळुरूला १९६ धावांचा टप्पा गाठता आला.
बंगळुरूकडून कर्णधार रजत पाटीदारने सर्वाधिक ५१ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने ३१ धावांची खेळी केली. सलामीवीर फिल सॉल्टने ३२ धावा केल्या. देवदत्त पड्डिकलने २७ धावा ठोकल्या. टीम डेविड जबरदस्त खेळला. त्याने ८ बॉलमध्ये २२ धावा तडकावल्या. शेवटच्या षटकांत डेविडने ३ षटकार ठोकले. त्यामुळे बंगळुरूला ही मोठी धावसंख्या गाठता आली.
चेन्नईकडून नूर अहमदने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर मथीशा पथिरानाने २ विकेट घेतल्या. चेन्नईला या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर त्यांना १९७ धावा कराव्या लागतील.