मुंबई : एप्रिल महिना आणि आर्थिक नव वर्षाला सुरुवात होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. दरम्यान नवा महिना सुरु होण्याआधी दोन दिवसापूर्वीच आरबीआयकडून (RBI) बँक सुट्ट्यांची यादीजाहीर करण्यात येते. त्यानुसार एप्रिल महिन्यातील बॅमक सुट्ट्यांची यादी देखील आरबीआयने जाहीर (April Bank Holidays) केली आहे. या महिन्यात १२ दिवस बँका बंद असणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी वेळापत्रक पाहूनच बँकेची कामे हाती घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे.
Bank Holiday : बँकेची ईदची सुट्टी रद्द; ३१ नव्हे ‘या’ तारखेला राहणार बँका बंद!
पाहा बँक सुट्ट्यांच्या यादी
- १ एप्रिल २०२५ मंगळवार या दिवशी व्यावसायिक बँकांच्या वार्षिक इन्व्हेंटरीमुळे या दिवशी बँका बंद राहतील.
- ६ एप्रिल २०२५ रविवार असून रामनवमी देखील आहे.
- १० एप्रिल २०२५ गुरुवार रोजी जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त या दिवशी देशभरातील बँका बंद राहतील.
- १२ एप्रिल २०२५ शनिवारी महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील.
- १३ एप्रिल २०२५ रविवार या दिवशी देशभरातील बँका बंद राहतील.
- १४ एप्रिल २०२५ सोमवार संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरातील बँका बंद राहतील.
- १५ एप्रिल २०२५ मंगळवार यावेळी बोहाग बिहूमुळे कोलकाता, आगरतळा, शिमला, गुवाहाटी आणि इटानगरमधील बँका बंद राहतील.
- १६ एप्रिल २०२५ बुधवार दिवशी बोहाग बिहूमुळे गुवाहाटीमध्ये या दिवशी बँकांना सुट्टी.
- १८ एप्रिल २०२५ शुक्रवारी गुड फ्रायडे मुळे देशभरातील बँका बंद राहतील.
- २१ एप्रिल २०२५ सोमवारी गरिया पूजेमुळे फक्त आगरतळामधील बँका बंद राहतील.
- २६ एप्रिल २०२५ शनिवार हा दिवस महिन्याचा चौथा शनिवार आहे, त्यामुळे देशभरातील बँका बंद राहतील.
- २९ एप्रिल २०२५ मंगळवार हा दिवस भगवान श्री परशुराम जयंती आहे. त्यामुळे या दिवशी बँकांना सुट्टी असेल.
- ३० एप्रिल २०२५ बुधवारी बसव जयंती आणि अक्षय्य तृतीयेमुळे बेंगळुरूमध्ये बँका बंद राहतील. (April Bank Holidays)