Kl Rahul : सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात केएल राहुल करणार कमबॅक

मुंबई : दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल २०२५ मध्ये त्यांच्या मोहिमेची शानदार सुरुवात केली. त्यांनी सोमवारी पहिल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध अवघ्या १ विकेटने रोमांचक विजय मिळवला. तथापि, सामन्यात डीसीसाठी केएल राहुलची मोठी उणीव भासली. तो या सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. दिल्लीच्या पहिल्या सामन्याच्या दिवशी राहुलची पत्नी आथिया शेट्टीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. यासाठी संघ व्यवस्थापनाने राहुलला पहिला सामना न खेळण्यास विशेष परवानगी दिली होती.


राहुल हा डीसी लाइनअपमधील सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे, त्याला आयपीएल २०२५च्या लिलावात १४ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले होते. राहुलचे आयपीएलमध्ये कधी पुनरागमन होईल, याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. अखेर त्याच्या परतीची तारीख समोर आली आहे. ज्यामुळे डीसी चाहत्यांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.



केएल राहुल रविवारी, ३० मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सच्या दुसऱ्या सामन्यात मैदानात उतरेल. ही लढत सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध विशाखापट्टणम येथील वायएस राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. राहुल आयपीएल २०२४ पासून एकही टी-२० सामना खेळलेला नाही. त्याला २०२४ च्या टी-२० विश्वचषक संघातही स्थान मिळवता आले नाही. पण त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ नंतर मिळालेल्या वेळेचा पुरेपूर वापर केला आहे. तो टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्या देखरेखीखाली मुंबईत सराव केला.


आयपीएलच्या इतिहासात दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आतापर्यंत एकूण २४ सामने खेळले गेले आहेत. यापैकी हैदराबाद संघाने १३ सामने जिंकले आहेत. दिल्ली कॅपिटल्स ११ लढतींमध्ये विजय मिळवला आहे. विशाखापट्टणम स्टेडियमवर आतापर्यंत त्यांच्यात एकही सामना झालेला नाही.

Comments
Add Comment

टी-२० विश्वचषकातून वगळल्यानंतर अखेर शुभमनचे मौन सुटले

बडोदरा : भारतीय कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने २०२६ च्या टी-२० विश्वचषक संघातून वगळल्याबद्दल

जेमिमाला दिलेलं वचन सुनील गावस्कर यांनी पाळलं

मुंबई : भारतीय क्रिकेटचे दिग्गज सुनील गावस्कर यांनी दिलेले एक खास वचन अखेर पूर्ण झाले आहे. भारतीय संघाने विश्वचषक

भारत विरुद्ध न्यूझीलंड ‘वन-डे’ची आजपासून रणधुमाळी

स्टार खेळाडूंचे पुनरागमन; जयस्वाल-पंत कट्ट्यावर? बडोदरा : भारतीय क्रिकेट संघ आपल्या पूर्ण ताकदीनिशी, रविवार (११

Cricket News: स्थानिक क्रिकेटपटुचा सामानादरम्यान मैदानातच मृत्यु; खेळता खेळता अचानक खाली पडला..

मिझोरममध्ये क्रिकेटसृष्टीत दुर्दैवी घटना घडली आहे. राज्याचे माजी रणजी क्रिकेटपटू आणि वेंघनुई रेडर्स सीसीचे

तिलक वर्मा दुखापतग्रस्त

नवी दिल्ली : आगामी न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला एक मोठा धक्का बसला आहे. युवा आणि प्रतिभावान

अॅशेसवर ऑस्ट्रेलियाचेच नांव

इंग्लंडवर ५ गडी राखून विजय; मालिका ४-१ ने खिशात सिडनी : सिडनी क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या अॅशेस मालिकेतील पाचव्या