
भुसावळ : भुसावळ रेल्वे स्थानकावर ५०० रुपयांच्या सुमारे एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा सापडल्याने खळबळ माजली आहे. या नोटा संशयितांच्या सामानातून मिळाल्या असून, पोलिसांनी त्या ताब्यात घेतल्या आहेत.
मलकापूरवरून भुसावळच्या दिशेने रेल्वेने येणाऱ्या दोन संशयास्पद प्रवाशांवर रेल्वे पोलिसांचा संशय बळावला. त्यांच्या सामानाची झडती घेतली असता, त्यात एक कोटी रुपयांच्या बनावट नोटांचा साठा आढळला.
/>
तपासादरम्यान एक संशयित पसार झाला, तर दुसऱ्याला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. सामानात सापडलेल्या ५०० रुपयांच्या बंडलमध्ये वरची नोट खरी होती, परंतु खालच्या सर्व नोटांवर ‘चिल्ड्रन बँक’ असे लिहिलेले असल्याने त्या बनावट असल्याचे उघड झाले.
या घटनेमुळे रेल्वे पोलिसांनी सतर्कता वाढवली असून, तपासाला वेग आला आहे. बनावट नोटांचा साठा आढळल्याने रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी खबरदारी वाढवली आहे. अटकेतील संशयिताची कसून चौकशी सुरू असून, पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरू आहे.

वजन कमी करणे (weight loss) केवळ सौंदर्यासाठी नव्हे, तर आरोग्यासाठीही आवश्यक आहे. आजची धावपळीची जीवनशैली, जंक फूडची सवय, आणि वाढता तणाव यामुळे लठ्ठपणाचे प्रमाण ...