सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी जरूर खा कच्चा लसूण, मिळतील हे फायदे

मुंबई: लसूणचा वापर भारतीय जेवणात फोडणीच्या रूपात केला जातो. यामुळे खाण्याचा स्वाद वाढतोच. सोबतच लसूण आरोग्यासाठीही फायदेशीर असतो. लसूण एक आरोग्यदायी मसाल्याचा पदार्थ आहे. यात एलिसिन नावाचा घटक असतो. एलिसिनमध्ये अँटी इन्फ्लामेंटरी आणि अँटीऑक्सिडंट गुण आढळतात. यामुळे रक्त प्रवाह सुधारण्यास मदत होते.


लसूणचे सेवन रिकाम्या पोटी करणे फायदेशीर मानले जाते. हे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने आरोग्यास अनेक लाभ मिळतात.


सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या दूर होतात. यामुळे गॅस आणि अॅसिडिटीपासून सुटका मिळते.


ज्या लोकांना बद्धकोष्ठता, पोट फुगणे तसेच करपट ढेकर या समस्या असतील तर त्यांनी रिकाम्या पोटी लसूणचे सेवन जरूर करावे.


हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठीही रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने अधिक फायदे मिळतात.


लसूणमध्ये अनेक असे घटक आढळतात जे पोट आणि कमरेजवळची चरबी वेगाने घटवतात.


सकाळी रिकाम्या पोटी लसूणचे सेवन केल्याने अनेक फायदे मिळतात. यामुळे लिपिड प्रोफाईल व्यवस्थित करण्यास मदत होते. लसणीमध्ये नैसर्गिक अँटीबायोटिक गुण असतात. रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने आतडे मजबूत होतात.

Comments
Add Comment

योगाचे प्रकार

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके मागील लेखात पातंजल-योगाव्यतिरिक्त योगाच्या इतर प्रकारांपैकी हठयोगाविषयी माहिती

Health: सकाळी, दुपारी की रात्री? ड्रायफ्रुट्स खाण्याची योग्य वेळ कोणती, घ्या जाणून...

मुंबई: सुका मेवा (Dry fruits) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु तो कोणत्या वेळी खावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे

उष्ण पदार्थांचे अति सेवन : उच्च रक्तदाब आणि त्वचेच्या समस्यांचे प्रमुख कारण !

मुंबई : आयुर्वेद हा भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये शरीराच्या संतुलनावर विशेष

साथींच्या आजारापासून मुलांना दूर ठेवा

विनायक बेटावदकर गणपती उत्सवापूर्वी सुमारे पंधरा दिवस, गणपती उत्सवात कल्याण शहर, ग्रामीण भागाचे हवामान साधारण

Sleep: शांत आणि गाढ झोपेसाठी या युक्त्या वापरून पहा

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात पुरेशी आणि शांत झोप मिळवणे अनेक लोकांसाठी एक आव्हान बनले आहे. निद्रानाश (Insomnia) ही

Health: साखरच नव्हे तर या पदार्थांमुळे तुमचे दात होतात खराब, वेळीच लक्ष द्या नाहीतर...

मुंबई: साखर आणि गोड पदार्थ खाल्ल्याने दातांना कीड लागते हे आपल्याला माहीत आहे. पण असे अनेक पदार्थ आहेत जे गोड