Ghibli Style Image : इंटरनेटवर Ghibli स्टाईलचा धुमाकूळ; अन् मुख्यमंत्री फडणवीसांची घिबली स्टाईल एन्ट्री!

  79

ओपनएआयच्या जीपीटी-४ ने त्यांच्या जीपीटी-४ओ मॉडेलमध्ये एक नवीन नेटिव्ह इमेज क्रिएशन फीचर सादर केले आहे . ज्यामुळे सोशल मीडियावर घिबली-शैलीतील पोर्ट्रेटचा व्हायरल ट्रेंड सुरू झाला. आपल्यापैकी अनेकांना अ‍ॅनिमेटेड चित्रपट पाहायला आवडत असतील. कारण अ‍ॅनिमे कॅरेक्टर्स हे दिसायला कार्टून सारखे असले तरी ते प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करतात. शिवाय ते दिसायला देखील फार युनिक असतात. पण विचार करा तुम्हाला देखील या अ‍ॅनिमे जगाचा पार्ट होण्याची संधी मिळाली तर? होय, अ‍ॅनिमे लव्हर्सची सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी चॅट जीपीटीनं एक नवं फिचर अपडेट केलं आहे. Ghibli आर्ट असं या फीचरचं नाव आहे.


Ghibli फिचरच्या मदतीने तुम्ही सुद्धा आपले फोटो अ‍ॅनिमे स्टाईलमध्ये कनव्हर्ट करू शकता. चॅट जीपीटीनं आपल्या GPT-४० या नव्या मॉडेलमध्ये एक इमेज जनरेटरचं फिचर दिलं आहे. या फिचरच्या मदतीनं तुम्ही स्वत:चे फोटो किंवा तुम्हाला हवे ते फोटो तुम्ही अ‍ॅनिमे स्टाईलमध्ये तयार करू शकता. सध्या सोशल मीडियावर या Ghibli फिचरचा प्रचंड वापर केला जातोय. सोशल मीडियावर जणू नवाच ट्रेंड आलाय असं म्हणायला हरकत नाही. इतकंच काय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील हा फिचर वापरून आपले फोटो पोस्ट केले आहेत.





मुख्यमंत्री फडणवीसांचा घिबली स्टाईल एन्ट्री


राज्याचे मुख्यमंत्री यांनी देखील हा घिबली स्टाईल फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या कुटुंबासह पंतप्रधान मोदींना सदिच्छा भेट देत असतानाच फोटो घिबली स्टाईलमध्ये पोस्ट केला आहे. आणि त्यावर लिहिलंय की, ही माझी घिबली स्टाईल एन्ट्री आहे. 'तंत्रज्ञान आपल्याला आनंदी होण्यापासून रोखत नाही'.





घिबली म्हणजे काय?


"स्टुडिओ घिबली हा एक प्रसिद्ध जपानी अॅनिमेशन स्टुडिओ आहे, जो सुंदर रचलेला, कल्पनारम्य आणि भावनिकदृष्ट्या प्रतिध्वनीत चित्रपट तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याची स्थापना १९८५ मध्ये अॅनिमेशनच्या जगातले दोन प्रभावशाली दिग्दर्शक हयाओ मियाझाकी आणि इसाओ ताकाहाता यांनी केली होती. स्टुडिओ त्याच्या अद्भुत कलाकृती, खोल कथाकथन आणि निसर्ग, मानवता, कल्पनारम्य आणि आत्म-शोधाच्या थीमसाठी व्यापकपणे ओळखला जातो."

Comments
Add Comment

वडोदरात गंभीरा पूल अपघातात १० जणांचा मृत्यू, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा !

वडोदरा: गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. बुधवारी सकाळी ७:३० वाजता महिसागर नदीवरील ४३

'निस्तार' भारतीय नौदलात दाखल, पहिले स्वदेशी पाण्याखालील मदतकार्य करणारे जहाज

विशाखापट्टणम : 'निस्तार' हे स्वदेशी रचना आणि निर्मिती असणारे पाण्याखाली उतरून मदतकार्य करणारे पहिलेच जहाज

२६/११ हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणाच्या कोठडीत १३ ऑगस्टपर्यंत वाढ!

नवी दिल्ली: मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणाच्या न्यायालयीन कोठडीत १३ ऑगस्टपर्यंत वाढ

मोठी बातमी : राजस्थानच्या चुरुमध्ये वायूसेनेचं विमान कोसळलं; २ मृतदेह आढळल्याची माहिती

चुरु (राजस्थान) : राजस्थानच्या चुरुमधील रतनगढ भागातील भानुदा गावात आज भारतीय हवाई दलाचं एक विमान दुर्घटनाग्रस्त

राजस्थानमध्ये हवाई दलाचे जग्वार विमान कोसळले, वैमानिकांचा मृत्यू

चुरू : राजस्थानमधील चुरू जिल्ह्यातील भानुदा गावाजवळ बुधवारी भारतीय हवाई दलाचे जॅग्वार लढाऊ विमान कोसळले. या

गुजरातमध्ये पूल कोसळला; ३ मृत्यू, अनेकजण बेपत्ता

नदीत दोन ट्रक, एक बोलेरो आणि इतर काही वाहने पडली अहमदाबाद