मुंबई : सध्या अनेक तरुण सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असतात. अशाच तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने तब्बल ६२० पदांची भरती जारी केली आहे. याबाबत जाहीरात काढली असून त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनावरील गट आणि गट डमधील विविध संवर्गातील पदे भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी महापालिकेने उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले आहेत.
नवी मुंबई महापालिका भरती प्रक्रिया जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय अभियांत्रिकी, तांत्रिक, लेखा व वित्त, उद्यान, सार्वजनिक आरोग्य, निमवैद्यकीय इत्यादी सेवेमधील आहेत. या जाहिरातीनुसार गट’क’ व गट ‘ड’ मधील एकूण ६२० पदांकरीता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक २८ मार्च २०२५ पासून ते दिनांक ११ मे २०२५ रोजी पर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांना www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर ११ मे २०२५ रात्री ११ वाजून ५५ मिनिटांपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकणार आहेत.
परीक्षेची तारीख, वेळ आणि केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल. तसेच संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध केली जाईल अशी माहिती नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…