मुंबई : प्रतिवर्षाप्रमाणे गुढीपाडव्याच्या शुभदिनी रविवारी गिरगावातील फडके श्री गणपती मंदिरापासून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान आयोजित यात्रेचे हे २३ वे वर्ष आहे. नुकताच केंद्र सरकारने मराठी भाषेला दिलेला अभिजात दर्जा दिल्याचे औचित्य साधून सर्व भारतीय भाषांना व्यवहारभाषा म्हणून वापरण्याचे आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे.
शहिद गौरव समितीतर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित संघाचे कार्य आणि विस्तार दर्शवणारा चित्ररथ वैशिष्ट्यपूर्ण असेल. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाचा अभिजात मराठी भाषेवरील चित्ररथ, सांस्कृतिक विभागाचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन कार्यावरील चित्ररथ यात्रेचे केंद्रबिंदू ठरतील. सकाळी ११ वाजता ठाकूरद्वार येथे नववर्ष संकल्प सभेचे आयोजन केले आहे. या संकल्प सभेसाठी महाराष्ट्रातील ३ पद्मश्री सर्वश्री ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, चित्रकार वासुदेव कामत आणि सुलेखनकार अच्युत पालव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.
गेली सहा वर्षे वाचकांच्या पसंतीस उतरलेला चैत्र स्वागत नावाचा नववर्ष स्वागत विशेषांक यावर्षी २३ मार्च २०२५ रोजी ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला आहे. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी फाल्गुन अमावस्येला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे गिरगावांतील विविध चौकात छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी केलेल्या बलिदानाचे स्मरण करण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने पारंपरिक वेशात या यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीधर आगरकर, कार्याध्यक्ष आशुतोष वेदक, सचिव स्वप्निल गुरव यांनी केले आहे.
उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…
दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…