बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील नवीन अपडेट समोर आली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींपैकी मुख्य तीन आरोपींनी हत्येची कबुली दिली असल्याची माहिती मिळाली आहे.
Gaurav Ahuja Pune : पुण्यात अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाची सुटका !
मिळालेल्या माहितीनुसार, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसह आठ आरोपी आहेत. यातील कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे. याबाबत केज न्यायालयात सुनावणी झाली. परंतु, सुरक्षेचे कारण देत सीआयडीने हे प्रकरण बीड न्यायालयात चालवावे, अशी विनंती केली होती. त्याप्रमाणे बुधवारी पहिली सुनावणी बीड न्यायालयात पार पडली. यावेळी विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी ३२ मिनिटांत खंडणी ते हत्या हा घटनाक्रम मांडला. तसेच सीसीटीव्ही फुटेज, सीडीआर, टॉवर लोकेशन, ऑडिओ-व्हिडीओ रेकॉर्डिंग असे पुरावे असल्याचे सांगितले. हेच पुरावे आम्हाला देण्यात यावेत, अशी विनंती आरोपींच्या वकिलांनी अर्ज करून केली. आता पुढील सुनावणी १० एप्रिल रोजी होणार आहे. त्याआधीच हत्येचा प्रमुख आरोपी सुदर्शन घुलेने पोलिसांसमोर कबूल केले आहे की, त्यानेच संतोष देशमुखांचे अपहरण करून हत्या केली. याशिवाय, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी देखील यासंबंधी आपली कबुली दिली असल्याची बातमी समोर आली आहे. सुदर्शन घुलेच्या कबुली नंतर वाल्मिक कराड अडचणीत येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.