अवघ्या तीन वर्षात दुसऱ्यांदा पक्षांतर करणार, स्नेहल जगताप राष्ट्रवादीत प्रवेश करणार

मुंबई : अवघ्या तीन वर्षात स्नेहल जगताप दुसऱ्यांदा पक्षांतर करणार आहेत. राज्यात तीन वर्षांपूर्वी राजकीय भूकंप झाला. त्यावेळी काँग्रेसमधून उद्धव ठाकरेंच्या गटात प्रवेश केलेल्या स्नेहल जगताप आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची मुंबईत भेट घेतल्यानंतर स्नेहल जगताप पक्षांतर करणार आहेत. उद्धव गटात असलेल्या स्नेहल जगताप आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.



विधानसभेसाठी २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत स्नेहल जगताप यांनी उद्धव गटाच्या तिकिटावर, शिवसेना उमेदवार भरत गोगावले यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भरत गोगावले विजयी झाले आणि स्नेहल जगताप यांचा पराभव झाला. यानंतर काही दिवसांपूर्वी मंत्री भरत गोगावले, विधान परिषदेतील भाजपाचे नेते प्रवीण दरेकर आणि स्नेहल जगताप हे तिन्ही पक्षांचे नेते पोलादपूर येथील कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर आले होते. तेव्हापासून स्नेहल जगताप या महायुतीत शिवसेना किंवा भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार अशी चर्चा होती. पण स्नेहल जगताप राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत.



स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यास भरत गोगावले यांच्यासमोर राजकीय आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्नेहल जगताप या राष्ट्रवादी काँग्रेसला फायद्याच्या ठरू शकतात; असे मत राजकीय अभ्यासक व्यक्त करत आहेत. खासदार सुनील तटकरे यांच्या राजकारणासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रायगड जिल्ह्यातील विस्तारासाठी स्नेहल जगताप यांचा पक्षप्रवेश उपयुक्त ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Comments
Add Comment

सुशोभिकरणाच्या कामांसाठी पुन्हा प्रशासनाने केला हात ढिला

माटुंगा,वडाळ्यातील कामांसाठी प्रलंबित बिलांचा मार्ग मोकळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेने हाती

मुंबई महापालिकेत ढाकणे आले, सैनी गेले

अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अमित

तक्रार येईपर्यंत थांबू नका, मतदारयादीतील चुका स्वतःहून दुरुस्त करा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतदारयाद्या अचूक असाव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व

तलाठी, तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांवर आता दक्षता पथकांचा ‘वॉच’

मुंबई : सर्वसामान्य जनतेला महसूल विभागाप्रती आपलेपणा वाटावा, तसेच कामे गतिमान व्हावी, या उद्देशाने महसूल

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता डिजिटल स्वरुपात

मुंबई : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार

डिजिटल ७/१२ ला कायदेशीर मान्यता, आता केवळ १५ रुपयांमध्ये मिळणार अधिकृत उतारा

मुंबई : महसूल विभागाच्या भूलेख महाभूमी पोर्टलवरून आता अवघ्या १५ रुपयांत सातबारा उतारा मिळू शकणार आहे. डिजिटल