नवी मुंबई : भारतामध्ये कोलोरेक्टल कॅन्सरच्या केसेस सतत वाढत आहेत. कोलोरेक्टल कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यात ओळखू यावा आणि त्याला प्रतिबंध घातला जावा यासाठी अपोलो कॅन्सर सेंटर्सने एक सर्वसमावेशक स्क्रीनिंग कार्यक्रम ‘कोलफिट’ सुरु केला आहे. रुग्णांच्या जिवंत राहण्याच्या दरामध्ये सुधारणा व्हावी, उपचारांच्या खर्चात घट व्हावी आणि निदान करण्यात विलंब यासारख्या चिंताजनक समस्या दूर करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
कोलफिट’ मध्ये वृद्ध आणि युवक दोघांसाठी देखील सीआरसी स्क्रीनिंग वाढवण्यावर ध्यान केंद्रित करण्यात आले आहे, आजार लवकरात लवकर लक्षात यावा यावर भर देण्यात आला आहे. भारतात सीआरसीचा वय दर १,००,००० पुरुषांमागे ७.२ आणि दर १,००,००० महिलांमागे ५.१ आहे, जो खूपच कमी आहे. देशाची लोकसंख्या १ अरबपेक्षा जास्त आहे, त्यामानाने केसेसची संख्या खूप जास्त आहे. त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे भारतात गेल्या पाच वर्षांमध्ये या आजाराच्या रुग्णांचा जिवंत राहण्याचा दर ४०% पेक्षा कमी आहे. धावपळीच्या व ताणतणावाच्या आयुष्यात बदललेली जीवनशैली व आहारातील बदल, व्यायामाचा अभाव, तंबाखू आणि मद्य सेवन, अनियमित झोप, लठ्ठपणा आणि मधुमेह, या सर्व कारणामुळे आतड्याच्या कर्करोगात वाढ होत आहे. वेळीच लक्ष दिले नाही तर हे प्रमाण अजून वाढत जाईल असे वास्तव समोर आले आहे.
फायबर कमी आणि प्रोसेस्ड फूड, रेड मीट, जंक फूड यांचे प्रमाण वाढले असल्याने व आहारात भाज्या, फळे, आणि तंतुमय पदार्थ नसल्यामुळे पचनसंस्था कमकुवत होते आहे. त्यामुळे आतड्यांवर ताण येतो. नियमित शारीरिक हालचाल नसल्याने स्थूलता आणि शारीरिक निष्क्रियता आल्याने आतड्यांमध्ये घाण साचून आतड्याचा कर्करोग होण्याचा धोका वाढत आहे.