Monday, May 12, 2025

ब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीसाप्ताहिकअर्थविश्व

'या' मोबाईल नंबरचे UPI अकाऊंट एक एप्रिलपासून बंद होणार

'या' मोबाईल नंबरचे UPI अकाऊंट एक एप्रिलपासून बंद होणार
मुंबई : नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयचे नवे निर्देश एक एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहेत. हे निर्देश लागू झाल्यानंतर बँका आणि यूपीआय अ‍ॅप इनअ‍ॅक्टिव्ह असलेले मोबाईल त्यांच्या यंत्रणेतून काढून टाकणार आहेत. जे मोबाईल नंबर काढून टाकले जातील त्या नंबरांचा वापर करुन नंतर कधीही कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन व्यवहार करता येणार नाही. काढून टाकलेल्या नंबरांचा वापर मोबाईल वॉलेट आणि यूपीआय व्यवहारांसाठीही करता येणार नाही. या प्रक्रियेत फक्त जे मोबाईल नंबर इनअ‍ॅक्टिव्ह असतील, तेच काढून टाकण्यात येणार आहेत.



इनअ‍ॅक्टिव्ह मोबाईल नंबर म्हणजे रिचार्ज संपल्यानंतर पुढील ९० दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळ रिचार्ज न केल्यामुळे बंद झालेले मोबाईल नंबर. हे इनअ‍ॅक्टिव्ह मोबाईल नंबर अॅक्टिव्हेट करता येतील की नाही याची अधिकृत माहिती संबंधित मोबाईल नंबरचे सर्व्हिस प्रोव्हायडर अर्थात सेवा प्रदाता देऊ शकतात. यामुळे आपला नंबर इनअॅक्टिव्ह झाला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी संबंधित नंबरच्या सर्व्हिस प्रोव्हायडरशी अथवा संबंधित नंबर ज्या कंपनीचा आहे त्यांच्या गॅलरीशी संपर्क साधणे हिताचे आहे.



हल्ली UPI द्वारे करायचे आर्थिक व्यवहार तसेच मोबाईल वॉलेट, बँकिंग, ऑनलाईन व्यवहार यासाठी मोबाईल नंबर महत्त्वाचा असतो. हा नंबर संबंधित व्यक्तीला ऑनलाईन आर्थिक व्यवहारांसाठी आवश्यक आहे. याच कारणामुळे एनपीसीआयच्या निर्देशानुसार इनअ‍ॅक्टिव्ह मोबाईल नंबरद्वारे आर्थिक व्यवहार होऊ नये यासाठ हे उपाय करण्याचा निर्णय झाला आहे.
Comments
Add Comment