Tuesday, April 29, 2025

महामुंबईब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीविडिओ

Disha Salian death case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट; आदित्यचा ड्रग्ज व्यवसाय; स्टिव्ह पिंटोला कोणी गायब केले?

Disha Salian death case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट; आदित्यचा ड्रग्ज व्यवसाय; स्टिव्ह पिंटोला कोणी गायब केले?

वकील निलेश ओझांचे गंभीर आरोप

मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात (Disha Salian death case) दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन () यांची कायदेशीर बाजू मांडणारे वकील निलेश ओझा यांनी माध्यमांशी संवाद साधताना काही धक्कादायक दावे केले आहेत.

आदित्य ठाकरे यांचा ड्रग्स व्यवसायात सहभाग

ओझा यांनी दावा केला की, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) तपासानुसार आदित्य ठाकरे यांचा ड्रग्स व्यवसायात सहभाग आहे आणि त्यासंबंधीचे ठोस पुरावे त्यांच्याकडे आहेत. त्यांनी सांगितले की, "आदित्य ठाकरे आणि दिनो मोरिया यांच्यातील फोन संभाषण हे त्याचे स्पष्ट पुरावे आहेत. समीर खान नावाच्या व्यक्तीची ‘DA-50’ नावाची कंपनी आहे, जी ड्रग्ज सिंडिकेटशी संबंधित असल्याचे NCB ने स्पष्ट केले होते. या कंपनीशी दिनो मोरिया, सूरज पांचोली आणि आदित्य ठाकरे नियमित संपर्कात असतात." तसेच, आदित्य ठाकरेंचा सहभाग समोर आल्यानंतर NCB आणि समीर वानखेडेंना कारवाई करण्यापासून कोणी रोखले? यासाठी किती कोटींची डील झाली?, असे प्रश्न ओझा यांनी उपस्थित केले.

https://youtube.com/live/3wRnLMQlpHE

दिशा सालियन प्रकरणात उद्धव ठाकरे देखील आरोपी

ओझा यांनी हेही आरोप केले की, दिशा सालियन प्रकरणात उद्धव ठाकरे देखील आरोपी आहेत. "आदित्य ठाकरेंच्या गुन्ह्यावर पांघरूण घालण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा गैरवापर केला. त्या काळात ते मुख्यमंत्री होते आणि त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला," असे त्यांनी ठामपणे सांगितले.

आवाज उठवण्यास उशीर झाला असे म्हणणाऱ्या व्यक्तींवरही कारवाई व्हावी

दिशाच्या कुटुंबीयांनी पाच वर्षांनंतर आवाज उठवण्यावर काहीजण प्रश्न उपस्थित करत असल्यावर ओझा म्हणाले, "११ डिसेंबर २०२३ रोजी सतीश सालियन यांचा जबाब विशेष तपास पथकाने (SIT) नोंदवला. त्यांनी प्रकरण पुन्हा उघडण्याची आणि आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता आवाज उठवण्यास उशीर झाला असे म्हणणाऱ्या व्यक्तींवरही कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे."

स्टिव्ह पिंटोला कोणी गायब केले?

याशिवाय, त्यांनी स्टिव्ह पिंटो नावाच्या व्यक्तीचा उल्लेख करत काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या. "स्टिव्ह पिंटो हा दिशाचा मित्र होता. त्याने काही ट्विट्स करून ७ जून २०२० रोजी एकता कपूरच्या घरी झालेल्या पार्टीविषयी माहिती दिली होती. त्या पार्टीला परमवीर सिंग, सुशांत सिंह राजपूत, दिशा सालियन आणि आदित्य ठाकरे हे उपस्थित होते. त्या ट्विट्समध्ये दिशाच्या हत्येचे संकेत दिले होते. मात्र, त्यानंतर स्टिव्ह पिंटो गायब झाला. स्टिव्ह पिंटोला कोणी गायब केले? त्यामुळे त्याचा शोध घेऊन चौकशी करावी," अशी मागणी ओझा यांनी केली.

आमची तक्रार खोटी ठरली, तर आम्हाला फाशी द्या

शेवटी, त्यांनी थेट आव्हान दिले की, "आमची तक्रार खोटी ठरली, तर आम्हाला कठोर शिक्षा द्या, फाशी द्या. पण आधी FIR दाखल करून योग्य तपास करा. तपास टाळण्याचे कारण काय? छत्रपतींच्या भूमीत एका अत्याचारित तरुणीच्या वडिलांना पाच वर्षे न्यायासाठी फिरावे लागत आहे, हे लाजिरवाणे आहे," असे ओझा यांनी ठणकावून सांगितले.

Comments
Add Comment