मुंबई-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; अभिनेता सोनू सूद यांच्या पत्नीला दुखापत

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांची पत्नी (Sonu Sood wife) सोनाली सूद यांना मंगळवारी मुंबई-नागपूर महामार्गावर झालेल्या मोठ्या अपघातात (accident on Mumbai-Nagpur highway) दुखापत झाली. मिळालेल्या माहितीनुसार, त्या आपल्या पुतण्यासोबत प्रवास करत असताना हा अपघात झाला. अपघातानंतर दोघांना तातडीने मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.



सोनू सूद यांनी दिली प्रतिक्रिया


अपघाताबाबत प्रतिक्रिया देताना सोनू सूद यांनी "ती आता पूर्णपणे ठीक आहे. एक मोठा अपघात टळला. ओम साई राम," असे म्हटले आहे.


या अपघातातून सोनाली सूद सुखरूप बचावल्याने चाहत्यांनी सुटकेचा श्वास घेतला असून, सोशल मीडियावर त्यांच्या जलद प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना केली जात आहे.

Comments
Add Comment

नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची संधी

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती महाराष्ट्र-बाडेन वुटेमबर्ग राज्यांदरम्यान संयुक्त

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; जमीन मोजणीच्या शुल्कात मोठी कपात

मुंबई : राज्य सरकारने महसूल प्रशासन अधिक सशक्त करण्यासाठी अनेक बदल राबवले असून, आता शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

'जिजामाता नगरवासियांच्या पुनर्वसनाचा विषय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार'

मुंबई :  मागील तीस वर्षांपासून काळाचौकी येथील जिजामाता नगरवासियांचे पुनर्वसन विकासकाच्या आडमुठेपणाच्या

चेंबूरमध्ये शिक्षणासाठी पाच किलोमीटर पायपीट

मराठी शाळेअभावी विद्यार्थ्यांचे हाल मुंबई : चेंबूर येथील वाशीनाका परिसरात पालिकेच्या मराठी माध्यमाची

मुंबईतील अनधिकृत झोपड्यांवर ‘नेत्रम’ची नजर

बांधकामाचे फोटो, बांधकाम करणाऱ्या व्यक्तीचे नाव अॅपवर समजणार मुंबई : मुंबईतील अनधिकृत झोपड्यांच्या समस्येवर

राज्यातील शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी!

परदेशी कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार मुंबई : कर्जमाफीबाबत राज्यातील