मुंबई: अहमदाबादच्या मैदानावर रंगलेल्या आयपीएल २०२५च्या पाचव्या सामन्यात पंजाब किंग्सने गुजरात टायटन्सवर ११ धावांनी जबरदस्त विजय मिळवला आहे. यासह पंजाबने या हंगामाची सुरूवात विजयी केली आहे. पंजाबने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद २४३ धावांचा डोंगर उभा केला होता. पंजाबचा हा धावांचा डोंगर गुजरातला पार करता आला नाही.
गुजरातच्या फलंदाजांनी हे आव्हान पार करण्यासाठी पुरेपूर तसेच शेवटपर्यंत प्रयत्न केले मात्र त्यांचे प्रयत्न फोल ठरले. गुजरात टायटन्सला २० षटकांत ५ बाद २३२ धावाच करता आल्या. गुजरात टायटन्सकडून सलामीवीर साई सुदर्शनने ७४ धावांची खेळी केली. त्याने ४१ बॉलमध्ये ५ चौकार आणि ६ षटकार ठोकत ही खेळी साकारली. कर्णधार शुभमन गिल मोठे फटके मारण्याच्या नादात ३३ धावांवर बाद झाला. जोस बटलरने ५४ धावा केल्या. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत गुजरातला केवळ धावाच करता आल्या.
तत्पूर्वी, हिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्स संघाने श्रेयस अय्यरच्या ९७ धावांच्या जोरावर २० षटकांत तब्बल २४३ इतक्या धावा केल्या.
श्रेयस अय्यरने ४२ बॉलमध्ये नाबाद ९७ धावांची खेळी केली. श्रेयसने आपल्या खेळीदरम्यान ५ चौकार तर ९ षटकार ठोकले. शशांक सिंह जबरदस्त खेळला. त्याने १६ बॉलमध्ये नाबाद ४४ इतक्या धावा तडाकावल्या. यात त्याने ६ चौकार आणि २ षटकार ठोकले.
श्रेयस अय्यरने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. त्याने २७ बॉलमध्ये अर्धशतक ठोकले होते.त्याच्याशिवाय सलामीवीर प्रियांश आर्यने ४७ धावा केल्या.
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…
सध्या आयपीएलचा सीझन रंगात आला आहे. संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून क्रिकेटप्रेमी टीव्ही किंवा मोबाईलसमोर ठाण मांडून…
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसन यांचे मत मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI)…
मुंबई : शिक्षकांसाठी ड्रेसकोड ठरवण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडून पुन्हा एकदा विचाराधीन आहे. प्रत्येक जिल्ह्याला…
काही दिवसांपूर्वी २६/११ चा मुंबई दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणा याचं भारतात प्रत्यार्पण झालं. त्यानंतर…