IPL 2025: अय्यर - शशांकची तडाखेबंद खेळी, पंजाबची किंग साईज धावसंख्या

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या हंगामातील पाचवा सामना आज गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात रंगला आहे. आयपीएल २०२५मध्ये दोन्ही संघांचा हा पहिला सामना आहे. अहमदाबादमध्ये खेळवल्या जात असलेल्या सामन्यात गुजरात संघाचा कर्णधार शुभमन गिलने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्स संघाने श्रेयस अय्यरच्या ९७ धावांच्या जोरावर २० षटकांत तब्बल २४३ इतक्या धावा केल्या आहेत.


श्रेयस अय्यरने ४२ बॉलमध्ये नाबाद ९७ धावांची खेळी केली. श्रेयसने आपल्या खेळीदरम्यान ५ चौकार तर ९ षटकार ठोकले. शशांक सिंह जबरदस्त खेळला. त्याने १६ बॉलमध्ये नाबाद ४४ इतक्या धावा तडाकावल्या. यात त्याने ६ चौकार आणि २ षटकार ठोकले.


पंजाबने गुजरातसमोर विजयासाठी २४४ धावांचे आव्हान ठेवले आहे. या सामन्यात श्रेयस अय्यरचे शतक ३ धावांनी हुकले. श्रेयस अय्यरने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. त्याने २७ बॉलमध्ये अर्धशतक ठोकले होते.त्याच्याशिवाय सलामीवीर प्रियांश आर्यने ४७ धावा केल्या.

Comments
Add Comment

दक्षिण आफ्रिकेला पाचवा धक्का, भारताचे गोलंदाज चमकले

नवी मुंबई : महिला वर्ल्डकप २०२५ च्या फायनल मॅचमध्ये भारताने दिलेल्या ५० षटकांत २९९ धावा करण्याच्या आव्हानाचा

अजित पवार सलग चौथ्यांदा राज्याच्या ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची सलग चौथ्यांदा राज्याच्या

IPL 2026 मिनी ऑक्शन परदेशात ? मोठी बातमी समोर आली!

मुंबई : आयपीएल २०२६ हंगामाची तयारी आता जोरात सुरू झाली आहे. सर्व संघांनी रणनिती आखायला सुरुवात केली असून, या वेळी

स्मृती मंधानाची ऐतिहासिक कामगिरी, मोडला मिताली राजचा विक्रम

नवी मुंबई : डी. वाय. पाटील स्टेडियम येथे सुरू असलेल्या आयसीसी महिला वर्ल्डकप २०२५ च्या फायनल मॅचमध्ये भारतीय

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पुनरागमन करत शफाली वर्माची दमदार खेळी

नवी मुंबई : आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ चा अंतिम सामना टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात सुरू आहे. या

भारताची फटकेबाजी, द. आफ्रिकेला दिले मोठे आव्हान

नवी मुंबई : महिला वर्ल्डकप २०२५ ची फायनल मॅच डी. वाय. पाटील स्टेडियम येथे सुरू आहे. नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने