अहमदाबाद : आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत चार सामने झाले आहेत. स्पर्धेतील पाचवा सामना मंगळवार २५ मार्च २०२५ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स हे दोन संघ या सामन्यात एकमेकांविरोधात मैदानात उतरतील. संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून हा सामना सुरू होणार आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही वाहिन्यांवर आणि जिओ हॉटस्टार अॅपवर हा सामना बघता येईल.
IPL 2025 Points Table: दिल्लीच्या विजयानंतर बदलले पॉईंट्स टेबल, पाहा कोणता संघ कितव्या स्थानी
आयपीएल २०२५, आतापर्यंत झालेल्या सामन्यांचा निकाल
२२ मार्च – १. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सात गडी राखून विजय, कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव; कोलकाता
२३ मार्च – १. सनरायझर्स हैदराबादचा ४४ धावांनी विजय, राजस्थान रॉयल्सचा पराभव; हैदराबाद
२. चेन्नई सुपरकिंग्सचा चार गडी राखून विजय, मुंबई इंडियन्सचा पराभव; चेन्नई
२४ मार्च – १. दिल्ली कॅपिटल्सचा एक गडी राखून विजय, लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव; विशाखापट्टणम
IPL 2025: ती शेवटची ३ षटके ज्यामुळे दिल्लीने लखनऊच्या तोंडातून हिरावून घेतला विजयाचा घास
गुजरात टायटन्स संघ : जोस बटलर (यष्टीरक्षक) , शुभमन गिल (कर्णधार) , साई सुधरसन , ग्लेन फिलिप्स , शाहरुख खान , वॉशिंग्टन सुंदर , राहुल तेवतिया , रशीद खान , रविश्रीनिवासन साई किशोर , कागिसो रबाडा , मोहम्मद सिराज , प्रसिद्ध शर्मा , पसिद्ध कृष्णा , ईशांत शर्मा, जयंत यादव , महिपाल लोमोर, करिम जनात, कुलवंत खेजरोलिया , अनुज रावत , जेराल्ड कोएत्झी , शेरफेन रदरफोर्ड , मानव सुथार , कुमार कुशाग्रा , अर्शद खान , गुरनूर ब्रार , निशांत सिंधू
IPL 2025: रोमहर्षक सामन्यात दिल्लीने मारली बाजी, लखनऊला १ विकेटनी हरवले
पंजाब किंग्ज संघ : जोश इंग्लिस (यष्टीरक्षक) , श्रेयस अय्यर (कर्णधार) , प्रभसिमरन सिंग , ग्लेन मॅक्सवेल , नेहल वढेरा , मार्कस स्टॉइनिस , शशांक सिंग , मार्को जॅनसेन , हरप्रीत ब्रार , अर्शदीप सिंग , युझवेंद्र चहल , विजयकुमार व्यशक, प्रवीण दुबे, लॉकी फर्ग्युसन , झेविअर बार्टलेट , विष्णू विनोद , यश ठाकूर , अॅरोन हार्डी , अजमतुल्ला ओमरझाई , कुलदीप सेन , प्रियांश आर्य , सूर्यांश शेडगे , हरनूर सिंग , मुशीर खान , पायला अविनाश