Thursday, May 22, 2025

महामुंबईमहाराष्ट्रताज्या घडामोडीपालघर

Crime : अश्लिल वर्तन केले म्हणून मुलीने केला बापाच्या गुप्तांगावर वार

Crime : अश्लिल वर्तन केले म्हणून मुलीने केला बापाच्या गुप्तांगावर वार
नालासोपारा : पालघर जिल्ह्यातील नालासोपाऱ्याच्या पूर्व भागातील बावशेत पाडा येथे धक्कादायक घटना घडली आहे. अश्लिल वर्तन केले म्हणून मुलीने सावत्र बापाचे गुप्तांग कापले. सावत्र बापाच्या सततच्या त्रासाला मुलगी कंटाळली होती. अखेर संतापलेल्या मुलीने धारदार सुऱ्याने बापाच्या गुप्तांगावर वार केला. तसेच त्याच्या शरीरावर इतरत्र पण वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बापाची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.



सावत्र बाप वारंवार अश्लिल वर्तन करत होता म्हणून त्याच्यावर चाकूने वार केल्याची कबुली मुलीने दिली आहे. जेव्हा घटना घडली तेव्हा सावत्र बाप गंभीर जखमी झाला आणि आरडाओरडा करू लागला. त्याचा आवाज ऐकून जमलेल्या लोकांनी मुलीला पोलीस न्याय देतील असे सांगितले. अखेर शेजाऱ्यांवर विश्वास ठेवून मुलीने हातातून धारदार सुरा खाली टाकला. नंतर पोलिसांना बोलावण्यात आले. पोलीस येताच मुलीने तिच्या कृत्याची कबुली दिली.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या आईने दुसरे लग्न केले होते. जखमी असलेला रमेश हा मुलीचा सावत्र बाप होता. लग्न झाल्यापासून रमेश जेव्हा जेव्हा संधी मिळे तेव्हा तेव्हा मुलीला एकटे गाठून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत होता. यावेळीही तसाच प्रकार घडला आणि संतापलेल्या मुलीने रमेशवर धारदार सुऱ्याने वार केले. या प्रकरणी मुलगी अटकेत आहे. जखमी असलेल्या मुलीच्या सावत्र बापाविरोधातही कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. पोलीस त्याची तब्येत सुधारण्याची वाट बघत आहेत. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
Comments
Add Comment