मुंबई : क्रिकेटपटू के एल राहुल (KL Rahul) आणि अथिया शेट्टी (Athiya Shetty) या दामपंत्याला कन्यारत्न झालं आहे. अथिया शेट्टी हिने २४ मार्चला एका मुलीला जन्म दिला आहे. अथिया शेट्टीने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून याबद्दची माहिती दिली आहे.
अथिया शेट्टीने (Athiya Shetty) तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. त्यामध्ये तिने एका मुलीची आई झाल्याची गोड बातमी दिली आहे. अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यावर लिहिले आहे की, ‘आम्ही एका मुलीचे पालक झालो आहोत..’ अथियाची ही पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यावर चाहते आणि सेलिब्रिटी या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत. अथियाच्या या पोस्टवर तिच्या सिनेसुष्टीतील मित्र- मैत्रिणींनी कंमेंट करून तिचे अभिनंदन केले. तिच्या या पोस्टला काही मिनिटांतच लाखो लाईक्स मिळाले आहेत.
अथिया शेट्टी ही सुनील शेट्टीची मुलगी असून तिने भारतीय क्रिकेटर केएल राहुलसोबत लग्न केले आहे. या दोघांचे लग्न २०२३ साली मोठ्या थाटामाटात पार पडले. अभिनेत्री अथिया शेट्टीने ‘हिरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर, ती ‘मुबारकन’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’मध्ये दिसली. परंतु दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करू शकले नाहीत. यानंतर अभिनेत्रीने स्वतःला अभिनयापासून दूर केले.
तर दुसरीकडे के एल राहुल हा दिल्ली कॅपिटल्स या संघाकडून आयपीएल खेळत आहे. दिल्ली कॅपिटल्सने १२ कोटी रुपये देऊन केएल राहुलला त्यांच्या संघात समाविष्ट केलं आहे. २४ मार्च रोजी त्याच्या घरी मुलीचा जन्म झाल्याने त्याने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धचा सामना सोडून मुंबई गाठली.