Saturday, April 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजकुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर महिलांनी अधिकाधिक प्रगतिशील व्यावसायिक व्हावे

कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर महिलांनी अधिकाधिक प्रगतिशील व्यावसायिक व्हावे

माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांचा मौलिक सल्ला

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे दरडोई उत्पन्न जर वाढवायचे असेल, महाराष्ट्राला आर्थिक साक्षर करायचे असेल आणि कुटुंबाला जर न्याय द्यायचा असेल तर अधिकाधिक महिलांनी प्रगतिशील व्यावसायिक झाले पाहिजे, असा मौलिक सल्ला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी सोमवारी दिला. लर्निंग लिंक्स फाउंडेशन आणि मास्टर कार्ड यांनी आयोजित केलेल्या सशक्ति २०२४ – २५ च्या वार्षिक सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

मुंबई येथील महिला आर्थिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या लर्निंग लिंक्स फाउंडेशन आणि मास्टर कार्ड यांच्या संयुक्त सशक्ति २०२४ – २५ च्या वार्षिक सोहळ्यासाठी यावेळी व्यासपीठावर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री कुमारी आदिती तटकरे, महिला आर्थिक विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक वर्षा लड्डा तसेच लर्निंग लिंक्स फाउंडेशनचे प्रमुख अधिकारी तसेच मास्टर कार्डचे शरदचंद्रन तसेच लाभार्थी व्यावसायिक महिला या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.

Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरला तेलंगणात अटक

यावेळी उपस्थित महिला वर्गाला मार्गदर्शन करताना खासदार नारायण राणे म्हणाले की, आज लोकसभेचे अधिवेशन सुरू असतानाही तेथे दांडी मारून मी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलो आहे. आपले कुटुंब राज्याच्या देशाच्या विकासात योगदान देतात का हे विचारायला खरेतर मी आज आलो आहे. लर्निंग लिंक फाउंडेशन आणि मास्टर कार्ड या दोघांचेही महिलांच्या उन्नती करता आणि आर्थिक साक्षरतेकरता जे प्रयत्न, उपक्रम सुरू आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. मी जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मालवणमधून प्रथम आमदार झालो. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न केवळ ३५ हजार रुपये होते. मात्र आता तेच दरडोई उत्पन्न अडीच लाख रुपये झाले आहे. कोकणचा, सिंधुदुर्गचा आर्थिक विकास करताना तेथे नैसर्गिक रित्या पिकणाऱ्या उत्पादनांचा अधिकाधिक वापर कसा करता येईल याचा विचार मी प्राधान्याने केला आणि त्यामुळेच कोकणातली कोकम पावडर आम्ही आता अमेरिकेत एक्स्पोर्ट करतो. फणसाच्या बिया मधुमेहावर औषध म्हणून गुणकारी असल्याने त्यादेखील विदेशात एक्स्पोर्ट केल्या जातात. आम्ही त्याचा वापर व्यावसायिकरित्या केला आणि त्याचा परिणाम हा सकारात्मक दृष्ट्या दिसून आला, असेही त्यांनी यावेळी अभिमानाने सांगितले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी उपस्थित महिलांना समयोचित मार्गदर्शन केले. यावेळी लर्निंग लिंक आणि मास्टर कार्ड यांच्या माध्यमातून व्यावसायिक भरारी घेणाऱ्या महिलांच्या यशस्वीतेची गोष्ट सांगणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन खासदार नारायण राणे तसेच महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती उर्मिला जोशी यांनी केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -