Nitesh Rane : मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा सरकारचा विचार

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे विधान परिषदेत अभ्यासपूर्ण उत्तर


गोड्या पाण्याच्या मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र पहिल्या तीन क्रमांकावर येईल असा प्रयत्न


मत्स्य विभागाच्या माध्यमातून स्वतंत्रपणे योजना सुरू करण्याचा प्रयत्न


नेदरलँड, सिडनी, इंडोनेशिया या देशांच्या धरतीवर मत्स्य उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न


गोड्या पाण्यातील मच्छीमारांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी मत्स्य धोरण तयार करणार


मुंबई : गोड्या पाण्यातील मासेमारीमुळे भोई आणि इतर समाजातील मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी सक्षम धोरण तयार करण्याचा हेतू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्य विभागाचा आहे. जेणेकरून मच्छीमार आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल आणि गोड्या पाण्याच्या मासेमारीत महाराष्ट्र राज्यात पहिल्या तीन क्रमांकावर येईल, असा प्रयत्न सुरू असल्याचे सांगतानाच मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न आहे आणि त्या संदर्भात माझ्या खात्याकडून प्रयत्न सुरू असल्याचेही विधान परिषदेत सांगितले.


मच्छीमारांना स्वतंत्रपणे योजना सुरू करण्याचा मत्स्य विभागाच्या माध्यमातून प्रयत्न आहे. तलावाचा गाळ काढणे आणि तलावांवरील अतिक्रमण हटवीणे यालाही माझ्या खात्याकडून प्राधान्य दिले जात आहे. पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा केला जात आहे.गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी अभ्यास गट तयार केले जातील. नेदरलँड, सिडनी, इंडोनेशिया या देशांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही मत्स्य उत्पादन वाढीसाठी मत्स्य विभागाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.



प्रश्नोत्तराच्या तासावर विधान परिषदेत मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी आमदार परिणय फुके, प्रवीण दरेकर, उमाताई खापरे,भाई जगताप, प्रसाद लाड, एकनाथ खडसे या आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांवर चर्चात्मक उत्तर देताना मंत्री नितेश राणे यांनी माहिती दिली.


आमदार फुके यांनी विदर्भातील गोड्या पाण्यातील मत्स्य शेती विषयी काही प्रश्न परिषदेत मांडले यावेळी चौकशी समितीची स्थापना करण्याची मागणी केली. यावरही मंत्री नितेश राणे यांनी पूर्व विदर्भातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी चौकशी समिती स्थापन केली जाईल. दोषींवर कारवाई केली जाईल व वस्तुस्थिती जाणून घेतली जाईल, असे सांगितले.


बारा कोटीचे उत्पन्न असलेला मत्स्य विभाग गोड्या पाण्यातील मासेमारीतून दोन कोटी एवढेच उत्पन्न येत आहे त्यामुळे हे उत्पन्न वाढले पाहिजे . गोड्या पाण्यातील मासेमारी करणाऱ्या कुटुंबांनाही त्याचा फायदा झाला पाहिजे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गोड्या पाण्यातील मासेमारीवरील धोरण तयार करत आहोत. विदर्भातील गोड्या पाण्यातील मत्स्य शेती संदर्भात महसूल मंत्री बावनकुळे यांच्या सूचनाही विचारात घेऊन काम सुरू आहे. असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा होणार उपलब्ध

मुंबई : कर्करोगाचे वाढते प्रमाण व कर्करोग उपचाराचे गांभीर्य विचारात घेता राज्यातील जनतेस सर्वसमावेशक कर्करोग

महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे निर्देश

मुंबई : देशभरातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी

डिजिटल गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ, सेक्सटॉर्शन आणि सायबर बुलिंगमधून मुंबईकरांची १२७ कोटींची लूट

मुंंबई: सेक्सटॉर्शन आणि सायबर बुलिंगमुळे मुंबईकरांना १२७ कोटी रुपयांना लुबाडले असल्याचा आकडा पोलीस तपासातून

महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ अतिरिक्त उपनगरी गाड्या

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन २०२५ निमित्त प्रवाशांच्या

ज्येष्ठांचा सन्मान करून साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांप्रती बांधिलकी जपणारा

मुंबईतील पाणी कपात घेतली मागे, काय आहे कारण..

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम प्रस्तावित आहे.