Emran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीचा 'आवारापन-२' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता इमरान हाश्मी नेहमीच चर्चेत असतो. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून इमरानने बॉलिवूडमध्ये त्याचं बस्तान बसवलं.अलिकडेच इमरान हाश्मी टायगर-३ चित्रपटामुळे चर्चेत आला होता. आज २४ मार्चला अभिनेत्याचा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून इमराने आवारापन चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा केली आहे.


इमरान हाश्मीच्या १८ वर्ष जुन्या चित्रपटाचा लवकरच सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो चित्रपट म्हणजे आवारापन आहे. नुकतीच इमरान हाश्मीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे. "बस मुझे कुछ दिन और जिंदा रख..., 'आवारापन-२' लवकरच तुमच्या भेटीला येत आहे. "अशा आशयाची पोस्ट अभिनेत्याने शेअर केली आहे. ३ एप्रिल २०२६ हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार आहे.



'आवारापन' हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता. परंतु बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला फारसं यश मिळालं नाही. मोहित सूरी दिग्दर्शित या सिनेमात साउथ अभिनेत्री श्रिया सरण इमरान हाशमीसोबत मुख्य भूमिकेत होती.

Comments
Add Comment

अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर

मुंबई: अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये

'दशावतार' सिनेमा पाहिल्यावर काय म्हणाले राज ठाकरे? पाहा Video

मुंबई: सध्या महाराष्ट्राच्या सिनेमाघरांमध्ये दशावतार या सिनेमाची चर्चा सुरू आहे. दशावतार सिनेमा

दशावतारान गाजवल्यान थिएटर!

५ कोटी २२ लाख कमाई, सगळीकडे शोज हाऊसफुल्ल ! Dashavtar Box Office Collection:  मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच

रजनीकांत होते 'दशावतार'साठी पहिली पसंत? दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे 'दशावतार'! हा चित्रपट

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक