Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीAccident News : काश्मीरमध्ये भीषण अपघात, महाराष्ट्रातील ३ पर्यटकांसह चौघांचा मृत्यू

Accident News : काश्मीरमध्ये भीषण अपघात, महाराष्ट्रातील ३ पर्यटकांसह चौघांचा मृत्यू

श्रीनगर : मध्य काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यातील कंगन येथील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या छावणीजवळ रविवारी (दि.२३) बस आणि कारची टक्कर होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात महाराष्ट्रातील ३ पर्यटकांसह एका स्थानिक चालकाचा मृत्यू झाला आहे. तर २१ जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील २ पर्यटकांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती देताना कंगनचे ब्लॉक मेडिकल ऑफिसर डॉ. अर्शिद बाबा यांनी सांगितले की, ‘ही एक दुर्दैवी घटना आहे.

Bullet Train Project : अहमदाबादमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पस्थळी अपघात, २५ गाड्या रद्द

केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या छावणीजवळ कार आणि प्रवासी बसमध्ये ही टक्कर झाली. यात महाराष्ट्रातील ३ जणांसह ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २१ जण जखमी झाले आहेत. या सर्वांवर उपचार सुरु आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.’ मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातातील मृतांनी ओळख पटली असून यात लेशिया आशिष परी, निक्की आशिष परी, हेतल आशिष परी या महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश आहे. तसेच ड्रायव्हर फहीम अहमद बदयारी जो सोईतांग श्रीनगरचा रहिवासी आहे, याचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. जखमींपैकी २ जणांना हाडांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले तर ८ जणांना एसकेआयएमएसमध्ये पाठवण्यात आले आहे. ५-६ जण सध्या निरीक्षणाखाली आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र २ जणांची प्रकृती गंभीर आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस अधिकारी आणि बचाव पथकानी बचाव कार्य केलं. या घटनेबाबत जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दुःख व्यक्त करत एका निवेदनात म्हटले आहे की, कंगनजवळील महामार्गावर झालेल्या रस्ते अपघातामुळे खूप दुःख झाले आहे, यात अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहे. शोकाकुल कुटुंबांसोबत माझ्या मनापासून संवेदना आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो. सध्या अधिकारी मदतकार्यात व्यस्त आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -