ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यक पल्लवी सरोदे यांचे अपघाती निधन

ठाणे : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या स्वीय सहाय्यक या पदावर कार्यरत असणाऱ्या पल्लवी सरोदे (वय ३७ वर्ष) यांचे रविवार २३ मार्च रोजी सकाळी हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर अपघाती निधन झाले. कार्यालयीन मैत्रिणींसह त्या हरिहरेश्वर या ठिकाणी सहली निमित्त गेल्या होत्या. तेथील समुद्रकिनारी त्या लाटेत अचानक ओढल्या गेल्या, त्यात त्यांचा मृत्यू झाला.



पल्लवी सरोदे या ठाणे जिल्हा प्रशासनात २०१२ रोजी लिपिक या पदावर रुजू झाल्या होत्या. मार्च २०२४ मध्ये त्यांना सहाय्यक महसूल अधिकारी पदावर पदोन्नती मिळाली होती. त्या सध्या जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत होत्या. पल्लवी सरोदे यांच्या पश्चात त्यांचे पती, सासू - सासरे आणि मुलगा असा परिवार आहे.
Comments
Add Comment

NEET 2026 : बारामतीच्या श्रावणी कुदळेची NEET 2026 मध्ये चमक; महाराष्ट्रात प्रथम, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन

बारामती : नीट २०२६ (NEET 2026) परीक्षेत बारामतीच्या श्रावणी कृष्णकांत कुदळे (Shravani Kudale) हिने उल्लेखनीय यश मिळवत

Pratap Sarnaik : एसटीचा प्रवास महागला; १३.५६ टक्के भाडेवाढ; डिझेल दरवाढीसह वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस

Nitesh Rane : सिंधुदुर्ग ग्लोबल इंडस्ट्रियल रिजनच्या (SGIR) विकासाला गती; औद्योगिक व पर्यटन पायाभूत सुविधांवर भर

मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सादरीकरण मुंबई : सिंधुदुर्ग ग्लोबल इंडस्ट्रियल रिजन (SGIR) प्रकल्पाच्या

Chemical Tanker Explosion : चेंबूरमध्ये केमिकल टँकरचा भीषण स्फोट, एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी

दुरुस्तीचे काम सुरु असताना अचानक केमिकल टँकर फुटला, दुर्घटनेत एकाचा मृत्यू मुंबई : चेंबूर (Chembur) पूर्व येथील मुकुंद

Mumbai News : 'तो पायाचा तुकडा कोणाचा?',CSMT स्थानकावर अमृतसर एक्स्प्रेसमध्ये धक्कादायक प्रकार

सीएसएमटी स्थानकावर धक्कादायक प्रकार; एक्स्प्रेसमध्ये आढळला मानवी पायाचा तुकडा, पोलीस तपास सुरु मुंबई : छत्रपती

State Examinations : राज्यातील सर्व परीक्षा ऑनलाइन घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती

'टीईटी' पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर सरकारचे पाऊल; दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई : राज्यात