Friday, April 18, 2025
Homeताज्या घडामोडीMNS Raj Thackeray : राज ठाकरेंनी भाकरी फिरवली; पक्षाच्या मुंबई शहराध्यक्षपदाची जबाबदारी...

MNS Raj Thackeray : राज ठाकरेंनी भाकरी फिरवली; पक्षाच्या मुंबई शहराध्यक्षपदाची जबाबदारी ‘या’ नेत्याकडे सुपूर्त

मुंबई : राजकीय वर्तुळातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज (दि २३) रवींद्र नाट्यमंदिरात मनसेची बैठक घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी मनसेतील नवीन पदे आणि पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. त्यानुसार फक्त विभाग अध्यक्ष असलेल्या मनसेत आता शहर अध्यक्ष आणि उप-शहर अध्यक्ष या नव्या पदांची निर्मिती करण्यात आली आहे. पक्षाच्या मुंबई शहराध्यक्षपदाची जबाबदारी संदीप देशपांडे यांना देण्यात आली आहे.

Shahid Diwas : २३ मार्च शहिद दिवस का साजरा केला जातो ?

मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्षसंघटनेत मोठे फेरबदल करण्याचे संकेत दिले होते. पक्षात कोणती पदे असतील, त्याची पुनर्रचना कशी असेल, पदाधिकाऱ्यांच्या आचारसंहितेत कोणते मुद्दे असावेत, याचा अभ्यास करून मागील काही दिवसांपासून राज ठाकरे हे स्वत: याबाबतचा आराखडा तयार करत होते. त्यानुसार आज मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत केंद्रीय समिती स्थापन करण्यासह महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मुंबईत पक्षाला बळकटी देण्यासाठी काय करायला हवं, याबाबत विचारमंथन करण्यात आले. संदीप देशपांडे यांना पक्षाच्या मुंबई शहराध्यक्षपदाची तर मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यावर गट अध्यक्षांच्या कामाचा आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर मनसेच्या शाखा अध्यक्षांच्या कामाचा आढावा घेण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे समजते. याशिवाय, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर यांच्यासह आणखी काही नेत्यांना मनसेच्या केंद्रीय समितीत स्थान देण्यात आले आहे.

ही केंद्रीय समिती मनसेतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर देखरेख ठेवणार आहे. आणि मुंबईच्या विभाग अध्यक्ष यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नितीन सरदेसाई यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर ३० मार्च रोजी नव वर्षाच्या मुहूर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसे गुढीपाडवा मेळावा होईल. या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -