Monday, May 12, 2025

महामुंबईमहाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

सुशांत प्रकरणी CBI च्या क्लोझर रिपोर्टवर काय म्हणाले दिशाच्या वडिलांचे वकील ?

सुशांत प्रकरणी CBI च्या क्लोझर रिपोर्टवर काय म्हणाले दिशाच्या वडिलांचे वकील ?
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणी सीबीआयने न्यायालयात क्लोझर रिपोर्ट सादर केल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. या पार्श्वभूमीवर दिशा सालियनचे वडील सतिश सालियन यांचे वकील नीलेश ओझा यांनी वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीला प्रतिक्रिया दिली आहे. कायद्यापुढे क्लोझर रिपोर्टला काहीही किंमत नाही. क्लोझर आल्यानंतरही आवश्यकता भासल्यास अथवा भविष्यात काही ठोस साक्षी - पुरावे समोर आले तर न्यायालय त्याची दखल घेऊन पुढील तपासाचे आदेश देऊ शकते. न्यायालयाकडून अद्याप कोणालाही क्लीन चिट देण्यात आलेली नाही. क्लोझर रिपोर्ट सादर झाला असूनही न्यायालयाने आरुषी तलवार प्रकरणी वॉरंट काढले आणि तपासाचे आदेश दिले. यामुळे या प्रकरणातही क्लोझर रिपोर्ट आला तरी आवश्यकता भासल्यास न्यायालय तपासाचे आदेश देऊ शकते; असे वकील नीलेश ओझा यांनी सांगितले.





कोविड काळात सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिचा मालाड येथे मृत्यू झाला. या घटनेला काही दिवस होत नाहीत तोच सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची बातमी आली. विशेष म्हणजे दिशाचा मृत्यू झाल्यानंतर ४८ तासांपेक्षा जास्त काळ झाल्यानंतर तिचे पोस्टमॉर्टेम करण्यात आल्याचा आरोप झाला. तर सुशांतचे मृत्यूनंतर तातडीने पोस्टमॉर्टेम करण्यात आले. दोन्ही प्रकरणात घटनांविषयी अतिशय हळू हळू त्रोटक माहिती प्रसिद्धीस दिली जात होती. पोलिसांनी मृतदेहांचा ताबा हस्तांतरित केला होत. यामुळे या दोन्ही प्रकरणात नकळत मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीभोवती संशयाचे धुके निर्माण झाले होते.



दिशाच्या मृत्यूच्या आधी तिच्या घरी एक सत्ताधारी मंत्री होता असाही आरोप झाला होता. तसेच दिशा आणि सुशांतच्या मृत्यूनंतर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. यामुळे सुशांत प्रकरणी सीबीआयने क्लोझर रिपोर्ट सादर करताच पुढे काय होणार यावरुन चर्चेला उधाण आले आहे.
Comments
Add Comment