पाटणा : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणी सीबीआयने न्यायालयात क्लोझर रिपोर्ट सादर केल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. या पार्श्वभूमीवर बिहारचे माजी पोलीस महासंचालक (माजी डीजीपी) गुप्तेश्वर पांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीला त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. सीबीआय ही गुन्ह्यांचा तपास करणारी एक व्यावसायिक संस्था आहे. जर पुरावे सापडले नाही तर सीबीआय आणखी काय करू शकते ? असे गुप्तेश्वर पांडे म्हणाले.
‘सालियन प्रकरण दडपण्यास मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा’
“सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा २० दिवसांनंतर त्याच्या वडिलांनी पाटणा येथे गुन्हा दाखल केला ज्याच्या चौकशीसाठी एक बिहारमधून एक पथक पाठवण्यात आले. पण महाराष्ट्रातील मुंबई पोलिसांनी सहकार्य केले नाही. मी चांगल्या समन्वयासाठी एका आयपीएस अधिकाऱ्याला पाठवले. पण त्याला क्वारंटाईन केले… मला कोणाविरुद्धही पक्षपाती राहण्याची गरज नाही पण त्या काळात मुंबई पोलिसांनी दाखवलेल्या वर्तनामुळे देशातील लोकांच्या मनात संशय निर्माण झाला… सीबीआयने प्रकरणाचा ताबा घेतला आणि तपास काही वर्षेदहा दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले. त्यामुळे, बिहार पोलिसांच्या पथकाला चौकशी करण्याची संधीही मिळाली नाही. सीबीआयला सर्व पुरावे मिळाले नाहीत किंवा कदाचित काही पुरावे नष्ट झाले असतील. पण मी कधीच असे म्हटले नाही की सुशांत सिंग राजपूतची हत्या झाली आहे… मी फक्त एवढेच म्हटले आहे की हा एक संशयास्पद मृत्यू आहे आणि त्याची हत्या झाल्याची शक्यता आहे. जर मुंबई पोलिसांनी हे प्रकरण चांगले हाताळले असते… पत्रकार परिषद घेतली असती आणि सर्व प्रश्नांची उत्तरे दिली असती तर मुंबई पोलिसांची बदनामी झाली नसती… सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टवर मी काहीही बोलू इच्छित नाही कारण ती एक व्यावसायिक एजन्सी आहे. जर तिला पुरावे सापडले नाहीत तर ती आणखी काय करू शकते ?” असे बिहारचे माजी पोलीस महासंचालक (माजी डीजीपी) गुप्तेश्वर पांडे म्हणाले.