Thursday, October 30, 2025
Happy Diwali

Shivshahi Buses : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये ८७२ वातानुकूलित शिवशाही बसेस धावणार

Shivshahi Buses : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये ८७२ वातानुकूलित शिवशाही बसेस धावणार

मुंबई : शाळांना सुट्टी लागल्यावर चिमुकल्यांना वेध लागतात ते गावी जाण्याचे. सध्या परीक्षा सुरू असल्या तरी त्यानंतर लागणाऱ्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावी जाण्याचे प्लॅनिंग तयार झाले आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यातील परिवहन मंडळही सज्ज झाले असून यंदा गावी जाणाऱ्यांना ‘सरप्राईज’ देण्याची तयारी एसटी महामंडळाने केली आहे. एसटी महामंडळ उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना थंडगार प्रवासाचा अनुभव देण्याची तयारी पूर्ण केली आहे.

राज्यभरात एकूण ८७२ वातानुकूलित शिवशाही बसेस उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांच्या सेवेत धावणार आहेत. उन्हाळ्यातील प्रवाशांची वाढती मागणी विचारात घेऊन एसटी महामंडळाने पुरेशा वातानुकूलित शिवशाही बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

दर महिन्याला ३०० गाड्या येणार सेवेत 

एसटी महामंडळाच्या ताफ्यात नजीकच्या काळात २६४० नवीन ‘लाल परी’ गाड्या दाखल होणार आहेत. दर महिन्याला ३०० गाड्या अशाप्रकारे टप्प्याटप्प्याने नवीन एसी लाल परी प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या जाणार आहेत. राज्यातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर प्रवासी वातानुकूलित बसेसकडे वळत आहेत. प्रवाशांची वाढती मागणी विचारात घेत उन्हाळी सुट्टीत ८७२ शिवशाही बसेस प्रवासी सेवेत धावणार आहेत. जादा लाल परी गाड्या सोडण्याचेही नियोजन महामंडळाकडून केले जात आहे.

Comments
Add Comment